

India Afghanistan Trade
esakal
Free Trade Agreement India: भारताने अफगाणिस्तानसोबतचा व्यापार तात्पुरता स्थगित केल्याचा पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंट्सचा दावा केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. सरकारने हे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. सरकारने अधिकृतपणे सांगितले की पाकिस्तानी प्रचार खात्यांकडून या संदर्भात एक बनावट पत्र प्रसारित केले जात आहे. पाकिस्तानी सोशल मीडिया दावा करत होते की इराणमधील परिस्थितीमुळे भारताने हे पाऊल उचलले आहे.