दोन पाकिस्तानींना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करा; भारत-फ्रान्सची UNSC कडं मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

United Nations Security Council

2019 मध्ये पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हे मुख्य आरोपी आहेत.

दोन पाकिस्तानींना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करा; भारत-फ्रान्सची UNSC कडं मागणी

फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्री कॅथरीन कोलोना (French Foreign Minister Catherine Colonna) यांच्या भारत भेटीपूर्वी, दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडं जैश-ए-मोहम्मदचे (Jaish-e-Mohammed) दहशतवादी मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीर (Terrorist Mohiuddin Aurangzeb Alamgir) आणि अली कासिफ जान (Ali Kashif Jan) यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी (International Terrorist) म्हणून घोषित करण्याचं आवाहन केलंय.

मंत्री म्हणून कोलोना पहिल्यांदाच भारतात येत आहेत. यादरम्यान त्या 14-15 सप्टेंबर रोजी दिल्लीत असतील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतील. या प्रकरणाशी संबंधित अधिकार्‍यांच्या मते, औरंगजेब आलमगीर उर्फ ​​मुजाहिद भाई आणि अली कासिफ जान उर्फ ​​अली कासिफ यांना UAPA 1967 कायद्यान्वये 12 एप्रिल रोजी भारत सरकारच्या गृह मंत्रालयानं दहशतवादी घोषित केलं होतं. हे दहशतवादी पाकिस्तानातील बहावलपूर आणि चारसद्दाचे आहेत. 2019 मध्ये पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी आहेत. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.

हेही वाचा: माफी मागणार नाही म्हणत 'आप'च्या नेत्यानं पत्रकार परिषदेतच फाडली उपराज्यपालांची नोटीस

मंत्री कोलोनांच्या भारत भेटीमुळं दोन्ही देशांमधील संबंध दृढ होणार

आलमगीर जैश-ए-मोहम्मदसाठी कट रचण्यात, निधी उभारण्यात सहभागी आहे. अफगाण दहशतवाद्यांची जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी आणि दहशतवादी घटनांमध्येही आलमगीरचा हात आहे. दुसरीकडं, खायबर पख्तूनखा चौरसद्दा येथील रहिवासी अली कासिफ हा जैशचा सक्रिय ऑपरेशनल कमांडर आहे. अली कासिफ 2016 मध्ये पठाणकोटमधील एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपासात आणखी अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचं समोर आलंय. एलओसीच्या सियालकोट भागातून तो आपलं नेटवर्क चालवतो. काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करण्यातही त्याचा सक्रिय सहभाग आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर आणि घेतलेल्या निर्णयानंतर फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री कोलोना यांच्या या भेटीमुळं दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होणार आहेत.

हेही वाचा: Amit Shah : गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक; संशयित व्यक्तीला पोलिसांनी केली अटक

Web Title: India And France Move To Unsc Want To Designate Two Pakistani From Jaish E Mohammed As Global Terrorists Catherine Colonna Visit India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..