
PM Narendra Modi
sakal
वाराणसी : ‘‘भारत आणि मॉरिशस या देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार हा परस्परांच्या चलनांतूनच करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. मोदी यांनी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्यासोबत वाराणसी येथे व्यापक चर्चा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.