"ऑस्ट्रेलिया ग्रुप'मध्ये भारताचा समावेश

पीटीआय
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

भारत हा गटाचा 43 वा सदस्य बनला आहे. या गटातील भारताच्या समावेशामुळे भारत आणि इतर सदस्य देशांना फायदा होणार असून भारतावरील जगाचा विश्‍वासही वाढीस लागणार आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिली

नवी दिल्ली - निर्यातीवर निरीक्षण आणि नियंत्रण ठेवणाऱ्या एमटीसीआर आणि वासेनार या दोन गटांमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर भारताचा आता ऑस्ट्रेलिया ग्रुप (एजी) या गटातही समावेश झाला आहे. निर्यात केलेल्या वस्तूंचा उपयोग रासायनिक अथवा जैविक शस्त्रे तयार करण्यासाठी होणार नाही, याकडे "एजी'चे लक्ष असते.

भारत हा गटाचा 43 वा सदस्य बनला आहे. या गटातील भारताच्या समावेशामुळे भारत आणि इतर सदस्य देशांना फायदा होणार असून भारतावरील जगाचा विश्‍वासही वाढीस लागणार आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिली. भारताने मिसाईल टेक्‍नॉलॉजी कंट्रोल रेजिम (एमटीसीआर) या गटात 2016 ला, तर वासेनार ऍरेंजमेंट या गटात गेल्या वर्षी प्रवेश मिळविला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india australia group