esakal | भारताचे चीन-पाकसोबतचे संबंध बिघडण्याची शक्यता; US गुप्तचर विभागाचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

china army

भारताचे चीन-पाकसोबतचे संबंध बिघडण्याची शक्यता; US गुप्तचर विभागाचा दावा

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- अमेरिकेच्या इंटेलिजन्स रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की, भारत आणि त्याचे शेजारी राष्ट्र चीन आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध ताणलेलेच राहणार आहेत. यूएस इंटेलिजन्स समूदायाने वार्षिक रिपोर्टमध्ये सांगितलंय की, भारत आणि चीनच्या सैनिकांनी सीमा भागातून माघार घेतली असली तरी दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले असतील. तसेच पाकिस्तानसोबत युद्धसदृश्य स्थिती असेल. येत्या काळात भारत आणि चीनमधील संबंध अधिक टोकाला जाऊ शकतात, असंही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. यूएस इंटेलिजन्स समूदाय दरवर्षी जागतिक धोक्यासंबंधी रिपोर्ट सादर करत असते.

हेही वाचा: भारतीयांनो तुम्हाला आमच्या देशात येऊ देतो, पण..; चीन सरकारने घातली अशक्य अट

चीनने मे 2020 मध्ये भारतीय भागात घुसखोरी केली होती. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झडप झाली. 1975 नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने तणाव वाढला होता. पहिल्यांदाच सीमाभागात रक्त सांडले होते. दशकातील ही सर्वात धोकादायक संघर्ष होता, असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. भारत आणि चीनमध्ये अनेक चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या आहेत. दोन्ही देशांच्या सैनिकांनी काही भागातून माघार घेतली आहे. पण, अजूनही काही महत्त्वाच्या भागातून सैन्य माघार व्हायची आहे. भारत आणि चीनचे सैन्य अजूनही आमने-सामने आहेत. त्यामुळे येत्या काळात संबंध आणखी टोकाला जाऊ शकतात.

हेही वाचा: चीन-अमेरिकेत थेट वाद-प्रतिवाद

पुढील वर्षात अमेरिकी लोकांना किंवा देशाच्या हितसंबंधांना अंतर्गत किंवा बाह्य घटकांकडून थेट किंवा अप्रत्यक्ष धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय, सत्तेसाठी आणि संसाधनांसाठी स्पर्धा, वांशिक आणि विचारधारेसंबंधी उठाव आणि अनेक देशांमध्ये युद्ध घडू शकते, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. Director of National Intelligence (DNI) कडून हा रिपोर्ट सादर करण्यात आला असून DNI ऑफीस इंटेलिजन्ससंबंधी अमेरिकेच्या अध्यक्षांना सल्ला देण्याचं काम करत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत आक्रमकतेने उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तान आणि भारतासारख्या न्यूक्लिअर पॉवर असणाऱ्या दोन देशांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते. काश्मिरमधील हिंसक आंदोलक किंवा दहशतवादी हल्ले कळीचे मुद्दे ठरु शकतात, असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.