निज्जरच्या मुलाचा गौप्यस्फोट! निज्जर कॅनेडियन गुप्तचरांच्या बैठकीला जायचा, ज्या दिवशी हत्या झाली तेव्हाही मीटिंग

भारत आणि कॅनडा या दोन देशांमध्ये खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येमुळे वाद निर्माण झाला होता. मात्र, निज्जरच्या मुलाने याबाबत गौप्यस्फोट केला आहे.
Nijjar
Nijjar
Updated on

Khalistan terrorist Nijjar:काही महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये हरदीप सिंग निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडाच्या पंतप्रधांनानी निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर मात्र कॅनडाच्या पंतप्रधानांचे चक्रचं फिरले. दोन्ही देशातील वाद विकोपाला गेला. कॅनडाच्या नागरिकांना भारतात येण्यासाठी व्हिजा नाकारण्यात आला. मात्र, ज्या निज्जरच्या हत्येनंतर कॅनडामध्ये खळबळ निर्माण झाली होती.

मात्र, आता या बाबतीत नविन खुलासा झाला आहे. निज्जर हा कॅनडाच्या गुप्तचर विभागात काम करायचा आणि दर हप्त्याला गुप्तचर विभागाच्या बैठकीला हजर राहायचा. असा खुलासा हरदीप सिंह निज्जरच्या मुलाने केला आहे.

निज्जरच्या मुलाच्या म्हणण्यानुसार, निज्जर आठवड्यातून एक किंवा दोनदा कॅनडाच्या गुप्तचर संस्थेच्या अधिकार्‍यांशी भेटत असे आणि हत्येच्या काही दिवसांपूर्वी अशीच बैठक झाली होती.

निज्जरच्या हत्येला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या भूमीवर "भारतीय एजंट्स" द्वारे हत्या केल्याचा आरोप केला होता. निज्जर हा कॅनडाच्या गुप्तचर संस्थेचा महत्वाचा व्यक्ती होता हे स्पष्ट झाले आहे. आता निज्जर यांचा २१ वर्षीय मुलगा बलराज सिंह निज्जर याच्या दाव्याने कॅनडावरचं आता भुवया उंचावल्या गेल्या आहेत.(Latest Marathi News)

Nijjar
Ganesh Visarjan:पुढच्या वर्षी लवकर या! दिमाखदार असं गणपतीचं विसर्जन, मुंबई-पुण्याच्या विसर्जनाबद्दल जाणून घ्या सर्वकाही

कॅनडाच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बलराज यांनेही अशा अनेक बैठकांना हजेरी लावली होती. बलराज सिंह निज्जर याने सांगितले की, 18 जून रोजी त्यांच्या वडिलांची हत्या झाली तेव्हा आणखी एक बैठक होणार होती. निज्जर हा भारतातील प्रतिबंधित दहशतवादी संघटना खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख होता. कॅनडामध्ये राहून तो खलिस्तान चळवळीला खतपाणी घालायचा.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) निज्जरला चार प्रकरणांमध्ये दोषी ठरवत खटला दाखल केला होता. खलिस्तानवाद्यांना पाकिस्तानच्या आयएसआयकडूनही मदत मिळत असल्याचा दावा भारत करत आहे. बलराजच्या कबुलीमुळे भारताच्या दाव्यालाही बळकटी आल्याचे दिसते.

मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्याने असाही दावा केला जात आहे की कॅनडामध्ये तैनात असलेल्या दोन आयएसआय एजंट्स - राहत राव आणि तारिक कियानी - यांना निज्जरला मारण्याची जबाबदारी देण्यात आली होती कारण तो काळाबरोबर त्यांच्यावर वरचढ ठरत होता.(Latest Marathi News)

Nijjar
अस्तित्वाची लढाई! ठाकरेंचा शिवाजी पार्कसाठी अर्ज, तर शिंदे गटाचे 'या' मैदानासाठी प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com