
कोरोना विषाणूला थोपवल्यानंतर चीनमध्ये उद्योगधंदे पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. मात्र, मागणीच नसल्यामुळे कारखाने उघडून काही फायदा होणार नाही. चीनमधील लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यांचा सत्तेप्रती असंतोष वाढत आहे.
नवी दिल्ली: भारत आणि चीनचे संबंध सध्या ताणले गेले आहेत. पूर्व लडाखच्या सीमा भागात चिनी सैन्य घुसल्याने तणावाची स्थिती आहे. कोरोना महामारीवरुन लक्ष हटावे यासाठी चीन खुसपटी काढत आहे. मात्र, चीनचा हा डाव त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. कारण चीनचे राष्ट्रपती क्षी जिंगपिंग यांची लोकप्रियता धोक्यात आली आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षामध्ये त्यांच्या नावावरुन कुरबुर सुरु झाल्याची बातमी आहे. जिंगपिंग यांनी सैन्याला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. इंच-इंच जमिनीची रक्षा करण्याचा संकल्प घेतला आहे. मात्र, चीनचा कोणताही शेजारी राष्ट्र अशा मानसिकतेत नसल्यानं जिंगपिंग यांचं वक्तव्य हास्यास्पद ठरत आहे.
.. म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले इराणचे आभार
चीनचा एकूण निर्यातीपैकी 17 टक्के माल अमेरिकेकडे जातो. सध्या या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी चिनी सामानावर कस्टम ड्यूटी वाढवली आहे. तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प चीनवर चिडले आहेत. अमेरिकी सिनेटने चीनमधील अमेरिकी कंपन्या वापस आणण्याचा कायदा मंजूर केला आहे. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर वाईट प्रभाव पडणार आहे. आय-फोन सारख्या कंपन्यांनी भारतात एक युनिट सुरु करण्याची घोषणा याआधीच केली आहे. कोरोनामुळे चीनमधील स्थिती बदलली आहे. चीनमधील अनेक कंपन्या भारतात आपले स्थलांतर करत आहेत. तसेच आत्मनिर्भर भारत योजनेमुळे चीनला मोठा फटका बसणार आहे. चीन भारताला एकूण निर्यातीच्या 3 टक्के वस्तू निर्यात करते. त्यामुळे अमेरिका आणि भारताकडे निर्यात होणारा 20 टक्के माल धोक्यात आला आहे.
पाकिस्तानकडून पुन्हा नापाक कृत्य ; भारतीय राजदूतांना धमकावण्याचा प्रयत्न
कोरोना विषाणूला थोपवल्यानंतर चीनमध्ये उद्योगधंदे पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. मात्र, मागणीच नसल्यामुळे कारखाने उघडून काही फायदा होणार नाही. चीनमधील लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यांचा सत्तेप्रती असंतोष वाढत आहे. तसेच हाँगकाँगमधील परिस्थिती चीन ज्याप्रमाणे हाताळत आहे त्याविरोधात चीनमध्येही रोष वाढत आहे. चीनचा बेरोजगारी दर 6 टक्क्यांनी वाढला आहे. चीनची अर्थव्यवस्था 13.7 ट्रिलियन डॉलर आहे. मात्र, 1976 नंतर पहिल्यांदाच चिनी अर्थव्यवस्था 6.8 टक्क्यांनी घसरली आहे. चीन भयानक मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहे. चीनने अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक पैसे बाजारात ओतले आहेत. पण नजीकच्या काळात ही हानी भरुन काढणे चीनला अवघड जाणार आहे.