पाकिस्तानकडून पुन्हा नापाक कृत्य; भारतीय राजदूतांना धमकावण्याचा प्रयत्न

ISI member chases vehicle of India's Charge d'affaires Gaurav Ahluwalia
ISI member chases vehicle of India's Charge d'affaires Gaurav Ahluwalia

इस्लामाबाद - पाकिस्तानने पुन्हा आणखी एक नापाक कृत्य केले आहे. इलाहाबादमध्ये भारताचे वरिष्ठ राजदूत गौरव अहुवालिया यांच्या घराबाहेर पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसने (आयएसआय) कार आणि दुचाकीसह काही जण तैनात केल्याचे दिसून आले आहे. याचबरोबर, गौरव अहलुवालिया यांना आयएसआयकडून धमकावण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गौरव अहलुवालिया यांचा दुचाकीवरून पाठलागही करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. एएनआयने यासंदर्भातील हा व्हिडीओ प्रसारित केला आहे. यामध्ये गौरव अहलुवालिया यांच्या कारचा पाठलाग एक आयएसआय एजंट करत आहे. ही घटना २ जून रोजी घडली आहे.

अहलुवालिया आपल्या घराबाहेर जात असताना आयएसआयचे एजंट त्याठिकाणी कार व दुचाकी घेऊन उभे होते आणि नंतर त्यांचा पाठलाग सुरू केला. याआधीही गौरव अहुवालिया यांना असाच त्रास देण्यात आला होता. दरम्यान, या घडलेल्या प्रकारबद्दल भारतीय दुतवासाने चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी दुतावासात काम करणारे दोन अधिकारी हेरगिरी करताना रंगेहात पकडले. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांनी ताब्यात घेतले. त्यामुळे गौरव अहुवालिया यांना त्रास दिला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी उच्चायोगातील तीन कर्मचाऱ्यांना भारताविरोधात हेरगिरी करत असताना अटक केली आहे. लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हे ऑपरेशन केलं होतं. चोरलेल्या दस्तावेजांची देवाणघेवाण करताना या तिघांना अटक करण्यात आली होती. आयएसआयच्या संपर्कात असलेल्या तिघांनी ही हेरगिरी केली असल्याचे समोर आले होते. परराष्ट्र मंत्रालयाने यातील दोघांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश दिला होता.

राजनैतिक दूतावासाशी संबंधित असूनही पदाला न शोभणारे, विसंगत कार्य केल्याबद्दल दोघांनाही २४ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश भारताकडून देण्यात आले होते. नेहमीप्रमाणे पाकिस्तानने हेरगिरीचे आरोप फेटाळले होते. राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी हे विएन्ना कराराचे उल्लंघन असल्याचेही पाकिस्तानने म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com