नेहरुंना लिहिलेल्या पत्राच्या आधारावर चीनचा लडाखवर दावा; भारताने केला अमान्य

पीटीआय
Wednesday, 30 September 2020

भारत आणि चीनदरम्यान १९५९ मध्ये निश्‍चित झालेल्या सीमारेषेशी चीन बांधिल असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने विधान केले होते. या विधानाला भारताने तीव्र विरोध केला.

नवी दिल्ली - प्रत्यक्ष ताबा रेषेबाबत १९५९ या सालात असलेल्या मान्येतेशी चीन बांधिल असल्याचे चीन सरकारने केलेले विधान भारताने काल साफ फेटाळून लावले. तात्पुरत्या स्वरुपात असलेल्या सीमारेषेबाबत एकतर्फी आणि वादग्रस्त दावे करणे चीनने थांबवावे, असा इशाराही भारताने दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारत आणि चीनदरम्यान १९५९ मध्ये निश्‍चित झालेल्या सीमारेषेशी चीन बांधिल असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने विधान केले होते. या विधानाला भारताने तीव्र विरोध केला. ‘१९५९ मध्ये एकतर्फी ठरविली गेलेली तथाकथित सीमारेषा भारताला प्रथमपासूनच मान्य नाही. ही भारताची भूमिका चीनसह सर्व जगाला माहिती आहे,’असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१९५९ मध्ये चीनचे तत्कालीन पंतप्रधान झोऊ एनलाय यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र पाठवत प्रत्यक्ष ताबा रेषेबाबत प्रस्ताव दिला होता. याच सीमारेषेला बांधील असल्याचे चीनचे म्हणणे आहे. मात्र, श्रीवास्तव यांनी भारत आणि चीनमध्ये १९९३, १९९६ आणि २००५ मध्ये झालेल्या करारांचा आणि विविध वेळी झालेल्या चर्चांचा दाखला देताना सीमा रेषा निश्‍चितीबाबत सर्व सहमतीने निर्णय घेण्याचे मान्य झाले असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे केवळ एकच ताबा रेषा असल्याचा चीनचा दावा दोन देशांदरम्यान झालेल्या करारांना विरोधाभासी असल्याचा दावा श्रीवास्तव यांनी केला. सीमेवर शांतता पाळत असल्याचा चीनचा दावाही भारताने फेटाळून लावला. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India China Border Dispute issue