esakal | गलवान पॅटर्न पेंगोंगमध्ये दिसेना! इथं भारत-चीन सैन्य आमने-सामने
sakal

बोलून बातमी शोधा

india, china, ladakh border, galwan valley, pangong

दोन्ही देशांतील वादग्रस्त मुद्यावर चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु असताना पेंगोंगमधील परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र दिसते. मेच्या सुरवातीपासून  भारतीय सैन्य गस्त घालत असलेल्या परिसर ब्‍लॉक करण्याच्या उद्देशाने चीनी सैनिकांनी उत्‍तरेच्या परिसरात कब्जा केलाय.  

गलवान पॅटर्न पेंगोंगमध्ये दिसेना! इथं भारत-चीन सैन्य आमने-सामने

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

लडाख सीमारेषेवर शांती प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने भारत-चीन यांच्यातील लेफ्टनंट दर्जाच्या सैन्य अधिकाऱ्यांमधील चर्चा सकारात्मक ठरली. वादग्रस्त मुद्यावरुन लडाखमधील गलवान परिसरात आमने-सामने आलेल्या दोन्ही देशातील सैन्य मागे हटल्याचे वृत्त आले. गलवान परिसरातील दोन्ही सैन्याची भूमिकेमुळे भारत-चीन यांच्यातील तणाव कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जाऊ लागली. पण हा समझोता पॅटर्न पेंगोंग परिसरात पाहायला मिळला नाही. या भागात अजूनही भारत-चीन सैन्य समोरासमोर आहे. लडाख सीमारेषेवरील वादग्रस्त मुद्यावर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये आजपासून बैठकांचा सिलसिला सुरु होणार आहे. दोन्ही देशांतील वादग्रस्त मुद्यावर चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु असताना पेंगोंगमधील परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र दिसते. मेच्या सुरवातीपासून  भारतीय सैन्य गस्त घालत असलेल्या परिसर ब्‍लॉक करण्याच्या उद्देशाने चीनी सैनिकांनी उत्‍तरेच्या परिसरात कब्जा केलाय.  

सॅटलाईट फोटोंमधून कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर, चीनमध्ये काय घडल? 

या मुद्यासंदर्भात अधिकृत सूत्रांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार,  गलवान खोऱ्यात ज्या ठिकाणी दोन्ही देशातील सैन्यामध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता (पेट्रोलिंग पॉइंट 154 आणि 15) त्याठिकाणापासून दोन्ही देशाच्या सैन्य माघारी हटले आहे. याशिवाय मागील दोन दिवसांत गोगरा भागातूनही सैन्य मागे हटले आहे. या भागात दोन्ही देशाकडून युद्धजन्य हालचाली पाहायला मिळाल्या होत्या. मात्र आता याठिकाणापासून दोन-ते तीन किलोमीटर अंतर दोन्ही सैन्य मागे सरकले आहे. या भागातील तणाव कमी होण्याचे हे संकेत मानले जात आहेत.  

दक्षिण कोरियाच्या 'त्या' कृतीमुळे किम जोंग उन संतापले; उचललं मोठ पाऊल

संबंधित अधिकाऱ्याचा हवाला देत टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पीपल्स लिबरेशन आर्मीने या परिसरातून जवळपास 20 वाहनांचा ताफा मागे बोलवला आहे. चिनी सैन्याकडूनच या ठिकाणी पहिल्यांदा संशयास्पद हालचाली घडल्या होत्या. त्यामुळे एवढे पुरेसे नसून चिनी सैन्याने आणखी काही पावले माघारी जाण्याची गरज आहे. चिनी सैन्य LAC पार करुन 3 किलोमीटर पर्यंत पुढे आले होते. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या सीमारेषेलगत लागून असलेल्या आपल्या हद्दीत टँक आणि आर्टिलरी गन्‍ससह 5 ते 7 हजार सैनिक तैनात केले होते. त्यांच्या या हालचालीनंतर भारतानेही त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून देत चीनसमोर ताकदिनीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. आक्रमणाला थोपवण्यासाठी भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर चीनचा आक्रमक अंदाज गळून पडल्याचीही चर्चा रंगली होती. 

loading image
go to top