
सिक्किममध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनी सैनिकांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता चिनने नरमाईची भूमिका घेतली आहे. भारतीय जवानांच्या आक्रमक प्रत्युत्तरानंतर चीनने प्रतिक्रिया दिली आहे.
बिजिंग - सिक्किममध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनी सैनिकांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता चिनने नरमाईची भूमिका घेतली आहे. भारतीय जवानांच्या आक्रमक प्रत्युत्तरानंतर चीनने प्रतिक्रिया दिली आहे. भारत चीन सीमेवर शांतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं चीनने म्हटलं आहे.
लडाखमध्ये भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर चीन भारतात वेगवेगळ्या कारवाया करत आहे. यामध्ये भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्नही होत आहे. चीनच्या या हालचालींवर भारत बारीक नजर ठेवून आहे. भारतीय जवानांनी चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे.
It's clarified that there was a minor face-off between Indian Army & Chinese PLA troops at Naku La, Sikkim on 20th January. It was resolved by local commanders as per established protocols: Indian Army https://t.co/nFLWUNb2kx
— ANI (@ANI) January 25, 2021
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी सांगितलं की, आमची सेना सीमेवर शांतीसाठी कटिबद्ध आहे. चीन भारताचा विनंती करतो की, सीमेवर कोणतीही एकतर्फी कारवाई करून नये ज्यामुळे परिस्थिती बिघडेल. भारताने सीमाभागात शांतता कायम ठेवायला हवी. जवळपास दोन महिन्यानंतर भारत आणि चीन यांच्यात लष्करी कमांडर पातळीवर बैठक झाली. रविवारी झालेली ही बैठक 11 तासांपर्यंत चालली. याआधी 6 नोव्हेंबरला दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली होती.
हे वाचा - ममतादीदी गरजल्या; 'स्वतःचं शीर धडावेगळं करून घेईन, पण भाजपपुढे झुकणार नाही'
डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यात 2019 मध्ये 73 दिवस संघर्ष सुरू होता. त्यानंतर तोडगा निघाला होता. लडाखमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती.