भारत-चीन तणावाची चिंता; रशिया धावणार मित्राच्या मदतीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india china conflict russia says will supply s 400 missile next year

भारत चीन सीमेवर तणाव वाढला तर युरोप आशियात अस्थिरता वाढण्याची भीती रशियाला आहे.

भारत-चीन तणावाची चिंता; रशिया धावणार मित्राच्या मदतीला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या परिस्थितीमुळे जगातील बलाढ्य देशही चिंतेत आहेत. दोन्ही देशांकडून सीमेवर अद्ययावत शस्त्रांसह सैन्य तैनात करण्यात आलं आहे. याबाबत आता रशियाने चिंता व्यक्त केली आहे. भारत चीन सीमेवर तणाव वाढला तर युरोप आशियात अस्थिरता वाढण्याची भीती रशियाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताची ताकद आणखी वाढवण्यासाठी एस 400 मिसाइल लवकरात लवकर देण्यात येईल असंही रशियाने म्हटलं आहे. 

ऑनलाइन मीडिया ब्रिफिंगमध्ये रशियाच्या रोमन बाबुश्किन यांनी सांगितलं की, आशियातील दोन मोठ्या देशांमधील तणावामुळे आम्ही चिंतेत आहे. दोन्ही देशात सकारात्मक संवाद होणं महत्त्वाचं आहे. भारत आणि चीन हे शांघाय सहकार्य संघटना आणि ब्रिक्सचे सदस्य असल्याचे सांगत बाबुश्किन यांनी म्हटलं की, या व्यासपीठावर संवाद हेच प्रमुख शस्त्र असते.

बाबुश्किन यांनी म्हटलं की, भारत, चीन संबंधांमध्ये रशियाचं स्थान थोडं वेगळं आहे. या दोन्ही देशांसोबत रशियाचे खास संबंध आहेत आणि वेगवेगळे आहेत. त्यामुळे भारत, चीन तणावामुळे आम्हाला काळजी वाटते. आज नाही तर उद्या यामध्ये शांततेनं मार्ग निघेल असं वाटतं. दोन्ही जागतिक आणि जबाबदार असे शेजारी आहेत. यांची ताकद आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रात मोठी असून समजुतदारपणाही आहे. 

हे वाचा - निवडणुकीनंतर पहिल्यांदाच समोर आले डोनाल्ड ट्रम्प, पराभव न स्विकारण्यावर अजूनही ठाम

रशियाने असंही सांगितलं की, भारताला लवकरच एस 400 मिसाइल प्रणाली सोपवण्यात येईल. त्यासाठी रशिया प्रयत्न करत आहे. एस 400 या हवेत हल्ला करणारी मिसाइल पुढच्या वर्षअखेरपर्यंत भारताला मिळू शकतात. रशियाचे डेप्युटी चिफ ऑफ मिशन रोमन बाबुश्किन यांनी म्हटलं की, दोन्ही देश लॉजिस्टिक सपोर्ट अॅग्रीमेंटवर काम करत आहेत. आणि अब्जावधी डॉलर्सच्या कराराला अंतिम रूप दिलं जात आहे. भारताने रशियासोबत एस 400 मिसाइल प्रणाली खरेदीसाठी 5 बिलियन डॉलरचा करार ऑक्टोबर 2018 मध्ये केला होता. 

पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात गेल्या सहा महिन्यापासून तणावाचं वातावऱण आहे. आता दोन्ही देशांनी उंच ठिकाणी तैनात असलेले सैनिक मागे घेण्याच्या प्रस्तावावर काम सुरू केलं आहे. युरोप आणि आशियात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा कहर आहे. त्यातच आर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं वातावरण तापलं आहे. 
 

loading image
go to top