esakal | निवडणुकीनंतर पहिल्यांदाच समोर आले डोनाल्ड ट्रम्प, पराभव न स्विकारण्यावर अजूनही ठाम
sakal

बोलून बातमी शोधा

Donald Trump

ट्रम्प यांनी अद्यापही पराभव स्विकारलेला नाहीये.

निवडणुकीनंतर पहिल्यांदाच समोर आले डोनाल्ड ट्रम्प, पराभव न स्विकारण्यावर अजूनही ठाम

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन :  अमेरिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची निवडणूक ठरली. या निवडणुकीत रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांनी तगडे आव्हान दिले. अटीतटीच्या ठरलेल्या निवडणुकीत अंतिमत: जो बायडेन यांचा विजय झाला आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेवर शंका घेत डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण प्रक्रियेवरच आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तरीही जो बायडेन यांना बहुमताने राष्ट्राध्यक्ष म्हणून माध्यमांकडून घोषित करण्यात आले आहे. 

हेही वाचा - खुशखबर : रशियन लस स्फुटनिक-व्ही ठरली 92 % टक्के परिणामकारक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीनंतर पहिल्यांदाच बुधवारी औपचारिकरित्या लोकांच्या समोर आले. राष्ट्रीय एकतेचे प्रतिक असलेल्या वेटरन्स डेच्या निमित्ताने ते लोकांसमोर आले होते. मात्र, अद्यापही ट्रम्प हे जो बायडेन यांचा विजय मान्य करण्यास तयार नाहीयेत. वॉशिंग्टनमध्ये पाऊस असतानाही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अर्लिंग्टन नॅशनल स्मशानभूमीत एका कार्यक्रमला पोहोचले. चार दिवसांपूर्वीच अमेरिकेतील माध्यमांनी त्यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी जो बायडेन हे आता पुढचे राष्ट्राध्यक्ष असतील, असं जाहीर केलं होतं. 

हेही वाचा - अभिमानास्पद! बायडेन यांच्या टीममध्ये 20 पेक्षा अधिक भारतीय वंशाचे व्यक्ती

ट्रम्प यांनी निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ट्विटरवरुन देशाला संबोधित केलं नाहीये. वेटरन्स डेनंतर त्यांनी केलेल्या भाषणात बायडेन यांचा विजय स्विकारला नाहीये. खरंतर अमेरिकेच्या निवडणुकीनंतर निकाल स्विकारण्याची परंपरा आहे. कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येत देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. हिवाळा सुरु व्हायच्या आधी कोरोना व्हायरसला अटकाव घालण्यासाठी नवे प्रतिबंध लागू केले गेलेत. ट्रम्प यांनी अर्लिंग्टनचा अगदी सिमीत असा दौरा केला. तसेच त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचे सर्व सामान्य कर्तव्ये देखील पार पाडली. त्यांनी याठिकाणी कोणतीही सार्वजनिकरित्या भाष्य केलं नाही. 

ट्रम्प यांनी अद्यापही पराभव स्विकारलेला नाहीये. ते अजूनही स्वत:च्या विजयावर ठाम आहेत. मतदानात फसवणूक झाल्याचा आरोप करत त्यांनी अनेक खटले दाखल केले आहेत. मात्र, हे सारे खटले पोकळ दाव्यांवर आधारित आहेत. 
 

loading image
go to top