नवी दिल्ली : ‘‘भारत आणि चीन परस्पर यशात महत्त्वाचे योगदान देऊ शकतात,’’ अशी भावना भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी व्यक्त केली आहे..आज वँग यी यांची परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत बैठक झाली. उद्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट महिन्याअखेर शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी चीनला जाणार असून त्यापूर्वी वँग यी यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेने छेडलेल्या आयातशुल्क युद्धामुळे पाच वर्षांपूर्वी झालेल्या गलवान संघर्षानंतर प्रथमच भारत आणि चीनची जवळीक पुन्हा वाढली आहे..‘‘भारत-चीन सीमेवर आम्ही शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. उभय देशांना विकासाबरोबर परस्पर यशात हातभार लावता यावा म्हणून आम्ही सहकार्य वाढवून चीन-भारत संबंधांमध्ये सुधारणा आणि विकासाच्या वेगाला आणखी मजबूत करण्याचा विश्वास निर्माण केला आहे,’’ असे मत वँग यी यांनी जयशंकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केले..स्पर्धेचे रुपांतर संघर्षात नको‘‘भारत आणि चीनच्या संबंधांनी अवघड कालखंडातून मार्गक्रमण केले असून आता दोन्ही देशांना पुढे जाण्यासाठी स्पष्ट आणि रचनात्मक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. परस्पर सन्मान, संवेदनशीलता आणि परस्पर हितांची काळजी घेण्याची गरज आहे. .त्यासाठी मतभेदांचे पर्यवसान वादात आणि स्पर्धेची परिणती संघर्षात होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. भारत-चीन सीमेवर शांतता आणि सौहार्द प्रस्थापित झाले तरच उभय देशांच्या संबंधांना सकारात्मक गती मिळू शकते. त्यासाठी उभय देशांदरम्यानचा तणाव कमी करण्याची आवश्यकता आहे,’’ असे मत जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केले..रशियाच्या तेलाची चीनकडून विक्री’न्यूयॉर्क रशियाकडून खरेदी केलेल्या तेलाचे शुद्धीकरण करून चीन तेच तेल जागतिक बाजारपेठेत विक्री करत आहे, असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आज केला. यातील बहुतांश तेलाची खरेदी युरोपकडूनही होत असून त्यांच्यावर निर्बंध लागू करण्याबाबत अद्याप विचार केलेला नाही, असेही रुबियो यांनी सांगितले. .Vidarbha Heavy Rain: यवतमाळ येथील पैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.ते म्हणाले,‘‘युरोपमधील अनेक देश रशियाकडून नैसर्गिक वायूची खरेदी करत आहेत. चीनही रशियाकडून तेलखरेदी करत असला तरी ते या तेलाचे फक्त शुद्धीकरण करतात आणि तेच तेल युरोपला विकतात. त्यामुळे युरोपवर निर्बंध लागू करण्याबाबत विचार झाला नसला तरी किमान अप्रत्यक्ष खरेदीसाठी काही निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे.’’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.