
तिआनजिन : भारत आणि चीनमधील सहकार्याचा संबंध दोन्ही देशांतील २.८ अब्ज लोकसंख्येच्या कल्याणाशी असल्याने परस्पर विश्वास, आदर आणि संवदेनशीलता या आधारावर चीनबरोबर संबंध दृढ करण्यास भारत कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. दहशतवाद ही जागतिक समस्या असल्याची भारताची भूमिकाही मोदींनी मांडली.