

India-China Trade Set to Resume via Lipulekh Pass After Six Years
esakal
India China Border Trade : उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून भारत आणि चीन यांच्यातील व्यापार सहा वर्षांच्या दीर्घ विरामानंतर पुन्हा सुरू होण्याची मोठी शक्यता आहे. यावर्षी जून महिन्यात हा शतकानुशतके जुना मार्ग सक्रिय होणार असून, दोन्ही देशांमधील संबंधांना नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पिथोरागढ जिल्हा प्रशासनाला याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी ए. के. भटगई यांनी या पार्श्वभूमीवर तयारीसाठी विशेष बैठक बोलावली असल्याचे सांगितले.