

जागतिक आर्थिक आणि व्यापारी राजकारण सध्या वेगळ्या वळणावर आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संरक्षणवादी धोरणांमुळे, टॅरिफ बॉम्बमुळे आणि अनिश्चित व्यापारी भूमिकेमुळे, अनेक प्रमुख देश आता अमेरिकेवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्याचे धोरणे स्वीकारत आहेत. या जागतिक बदलाच्या केंद्रस्थानी, भारत एक मजबूत आणि विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हणून उदयास येत आहे. युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील अनेक देश पारंपारिक पश्चिम-केंद्रित मॉडेलपासून दूर जात आहेत, अशातच आता भारताला दीर्घकालीन पर्यायी आणि धोरणात्मक संतुलन म्हणून पाहिले जाते.