esakal | Corona Updates: भारतात कोरोनाच्या उद्रेकामुळे जगभरात लसपुरवठ्यावर परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Vaccine_Supply

संसर्गाच्या या संकटकाळात लस उत्पादनाची सर्वाधिक क्षमता असलेली सीरम इन्स्टिट्यूट भारतात असल्याने हा देश भाग्यवान ठरत असल्याचे जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास मंगळवारी (ता.६) म्हणाले.

Corona Updates: भारतात कोरोनाच्या उद्रेकामुळे जगभरात लसपुरवठ्यावर परिणाम

sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन : भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या वेगाने वाढली असल्याने सरकारने लसीकरण मोहिमेला वेग आणला आहे. त्याचाच परिणाम म्हणून भारताकडून इतर देशांना होणाऱ्या लसपुरवठ्यात घट होण्याचा अंदाज ‘ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सीन अँड इम्युनायझेनश’ने (गॅवी) व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना आणि ‘गॅवी’ संस्थेमार्फत जगभरातील लसपुरवठ्याचे नियोजन केले जात आहे.

भारत हा जगातील सर्वांत मोठा लस उत्पादक देश आहे. तसेच, विकसनशील देशांना लसपुरवठा करण्यातही भारत अव्वल आहे. भारतात रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाल्याने सरकार साहजिकच आपल्या नागरिकांना अधिक प्राधान्य देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला देशांतर्गत वापरासाठी अधिक लशींची आवश्‍यकता पडणार असून त्याचा परिणाम जागतिक लसपुरवठ्यावर होऊ शकतो, असे ‘गॅवी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सेठ बर्कले यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले.

विवस्त्र होऊन महिलांनी शूट केला व्हिडीओ; त्यानंतर जे घडलं..​

‘जगभरातील एकूण स्थिती पाहता मार्च आणि एप्रिल या महिन्यांत भारताकडून आम्हाला नऊ कोटी लशींचे डोस मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, भारतातील रुग्णसंख्येतील वाढ पाहता अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी डोस मिळतील. तरीही आशेचा दुसरा एक किरण निर्माण झाला आहे. अनेक श्रीमंत देशांनी त्यांच्याकडील लोकसंख्येपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात लस विकत घेतली असल्याने ते उर्वरित लशींचा साठा इतर जगासाठी उपलब्ध करून देतील, अशी आशा आहे. त्यांनी मदत केल्यास जागतिक लसीकरण मोहिमेला मोठे बळ मिळेल,’ असे बर्कले यांनी सांगितले.

निवडणूक अधिकारी झोपला तृणमूल नेत्याच्या घरात; EVM मशिनही सापडलं​

भारत भाग्यवान : जागतिक बँक
संसर्गाच्या या संकटकाळात लस उत्पादनाची सर्वाधिक क्षमता असलेली सीरम इन्स्टिट्यूट भारतात असल्याने हा देश भाग्यवान ठरत असल्याचे जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास मंगळवारी (ता.६) म्हणाले. रुग्णसंख्या वाढत असली तरी भारतात लसीकरणाला वेग येत असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. सर्व देशांनी आपापली देशांतर्गत लशींची गरज आणि ते इतरांना किती पुरवठा करू शकतात, याबाबत निश्‍चित माहिती जाहीर करावी, असे आवाहन त्यांनी एका बैठकीदरम्यान केले. अद्यापही अमेरिका, युरोप, दक्षिण आफ्रिका आणि भारतानेही याबाबत ठोस आकडे प्रसिद्ध केले नसल्याचे मालपास यांनी सांगितले.

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image