
भारतात काही दशकांपूर्वी वाढती लोकसंख्या चिंतेचा विषय होता. सध्या भारत हा जगातला सर्वाधिक लोकसंख्या असणारा देशही आहे. दरम्यान, आता लोकसंख्या वाढीला अचानक ब्रेक लागल्याचं दिसतंय. याचा परिणाम येत्या काही दशकांमध्ये दिसू शकतो. वर्ल्ड बँकेच्या २०२३ च्या डेटानुसार भारतात लोकसंख्येची वाढ हम दो, हमारे दो या धोरणाच्याही मागे गेलीय.