Pakistan National Command Authority nuclear decision 2025 : भारत-पाकिस्तान तणाव वाढत असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी 'नॅशनल कमांड अथॉरिटी'ची इमर्जन्सी बैठक घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे नॅशनल कमांड अथॉरिटीकडे अणुबॉम्बच्या नियंत्रणाची जबाबदारी आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या डोक्यात अणुबॉम्ब हल्ल्याचा विचार सुरु आहे की काय अशी शंका उपस्थित होते आहे.