ब्राह्मोस क्षेपणास्त्र करारावर भारत -फिलीपीन्सची आज होणार स्वाक्षरी; चीनला झटका | Brahmos Missile | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BrahMos supersonic anti-ship cruise missile
ब्राह्मोस क्षेपणास्त्र करारावर भारत -फिलीपीन्सची आज होणार स्वाक्षरी; चीनला झटका | Brahmos Missile

ब्राह्मोस क्षेपणास्त्र करारावर भारत -फिलिपीन्सची स्वाक्षरी; चीनला झटका

फिलीपीन्स (Philippines) नौदलाला ब्रह्मोस (Brahmos) सुपरसॉनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्राच्या विक्रीसाठी भारत आणि फिलीपीन्स आज 375 दशलक्ष यूएस डॉलरच्या करारावर स्वाक्षरी करणार आहेत. फिलीपिन्सचे सर्वोच्च संरक्षण अधिकारी यावेळी उपस्थित असतील तर भारताचे राजदूत प्रतिनिधीत्व करतील अशी माहिती सरकारी अधिकारी दिल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. (India & Philippines to sign the USD 375 million deal for sale of BrahMos supersonic anti-ship cruise missile to the Philippines Navy today.)

हेही वाचा: समुद्रात भारताची ताकद वाढणार, नौदल 38 ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या तयारीत

दक्षिण चीन (south china sea) समुद्रात आपली ताकद दाखवणाऱ्या चीनला सध्या मोठा झटका बसला आहे. चीनच्या या आक्रमक वृत्तीला तोंड देत असलेल्या फिलीपिन्सने भारतासोबत जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्र (ब्रह्मोस) च्या (Brahmos) खरेदीला मान्यता दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काहीच दिवसांपूर्वी फिलिपाइन्सच्या (Philippines) राष्ट्रीय संरक्षण विभागाने ब्रह्मोसच्या अधिकाऱ्यांना ही माहिती पाठवली होती. ब्रह्मोससाठी पहिल्यांदाच विदेशातून मागणी करण्यात आली आहे. हा करार 374.9 दशलक्ष अमेरिकन (American Doller) डॉलर इतक्या किमतीला ठरला असून आज या करारावर स्वाक्षरी होणार आहे.

हेही वाचा: ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी

चीन विरोधात भारतावर विश्वास -

या करारातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेचा (America) मित्रदेश असणारा फिलीपिन्सने चीनविरुद्धच्या (China) लष्करी तयारीसाठी भारत-रशियाने (India-Russian) संयुक्तपणे बनवलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रा संदर्भात विश्वास दाखवला आहे. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आवाजाच्या तिप्पट म्हणजेच ताशी ४, ३२१ किलोमीटर वेगाने मारा करण्यास सक्षम आहे.

Web Title: India Philippines To Sign The Deal For Sale Of Brahmos Supersonic Anti Ship Cruise Missile To The Philippines Navy Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..