
नवी दिल्ली: अमेरिकेने H-1B व्हिसावर दरवर्षी १ लाख डॉलर म्हणजे ८३ लाख रुपये शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिलीय. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, या निर्णयाचे दुष्परिणाम आहेत. विशेषतः ज्या कुटुंबांचे जीवन यावर अवलंबून आहे, त्यांना त्रास होईल. सरकारने या निर्णयाचा सखोल अभ्यास करत असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. भारतीय उद्योगाने यावर एक प्राथमिक विश्लेषण सादर केले असून, H-1B व्हिसाबाबत अनेक गैरसमज दूर केले आहेत, असेही मंत्रालयाने म्हटले.