
Dandiya Function
esakal
शहरात रास–दांडियाचा उत्साह
– नवरात्रोत्सवात युवक–युवतींसाठी कोल्हापूरातील विविध संस्था, संघटना रास–दांडियाचे आयोजन करीत असून हॉल, मैदाने, लॉन सजवली जात आहेत.
पारंपरिक ढोल–वाद्यांवर नृत्य
– ढोल, नगार, ढोलक, हार्मोनियम, बासरीसह पारंपरिक वाद्यांवर रास–दांडियाचा आनंद; पुरुष–महिला गोलाकार किंवा समोरासमोर उभे राहून नृत्य करतात.
तारीख, स्थळ व वेळ निश्चित
– २३ सप्टेंबरपासून ५ ऑक्टोबरपर्यंत शहरातील विविध ठिकाणी रास–दांडियाचे कार्यक्रम नियोजित.
Kolhapur Dandiya : कोल्हापूर शहर परिसरातील विविध संस्था-संघटनांतर्फे नवरात्रोत्सवात रास दांडिया खेळण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. युवक-युवतींना दांडियाचा आनंद लुटता यावा, यासाठी हॉल, मैदाने, लॉन उपलब्ध केली जात आहेत. गणेशोत्सवानंतर आकर्षक रोषणाई, रंगीबेरंगी पोशाख व संगीतावर आता रात्रीचा उत्साह टिपेला पोहोचणार आहे.