India-Russia Relations: ''भारताला खूप महत्त्व आहे'', रशियाकडून अमेरिकेला स्पष्ट संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. या संवादात रशिया-युक्रेन युद्ध आणि द्विपक्षीय सहकार्यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
नवी दिल्ली: अमेरिकेच्या दबावामुळे आणि टॅरिफच्या धमक्यांनंतरही भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिक मजबूत होत आहेत. या पार्श्वभूमीवर, रशियाचे उपराजदूत रोमन बाबुश्किन यांनी भारताचे कौतुक केले आणि लवकरच पुतिन हे भारतात येणार असल्याचे सांगितले.