

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्या सुरूच आहेत आणि भारत-अमेरिका व्यापार करार अजूनही रखडलेला आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्येच यावरून गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. रखडलेल्या व्यापार करारावरून रिपब्लिकन गटात तणाव निर्माण झाला आहे. वृत्तानुसार एका अमेरिकन सिनेटरने वाटाघाटींमध्ये झालेल्या विलंबासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील प्रमुख व्यक्तींना जबाबदार धरले आहे.