esakal | UN महासभेत भारताने पाकला दाखवली जागा; इमरान खान यांच्या भाषणावेळी केलं वॉकआऊट
sakal

बोलून बातमी शोधा

pak india

संयुक्त राष्ट्रच्या महासभेत भाषण सुरु करताना इमरान खान म्हणाले की, गांधी आणि नेहरू यांच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांना सोडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न आरएसस करत आहे. 

UN महासभेत भारताने पाकला दाखवली जागा; इमरान खान यांच्या भाषणावेळी केलं वॉकआऊट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रसंघाच्या 75 वे अधिवेश न सुरु आहे. यामध्ये पाककडून सातत्याने काश्मीर मुद्द्यावरून भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान याचे भाषण सुरु होताच भारताच्या प्रतिनिधींनी विरोध म्हणून महासभेच्या हॉलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी महासभेतही त्यांच्या भाषणाची सुरुवात भारताच्या विरोधात बोलण्यापासूनच केली. त्यानंतर तात्काळ भारतीय प्रतिनिधी खूर्चीतून उठले आणि हॉलमधून बाहेर गेले.

पाकिस्तानकडून भारताविरोधात वक्तव्य आणि काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यानं भारतीय प्रतिनिधी मंडळाने इमरान खान यांच्या भाषणावर बहिष्कार घातला. कोरोनाच्या संकट काळात सध्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेचं आयोजन व्हर्च्युअल करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्रच्या महासभेत भाषण सुरु करताना इमरान खान म्हणाले की, गांधी आणि नेहरू यांच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांना सोडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न आरएसस करत आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या स्थायी प्रतिनिधींनी इमरान खान यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. 75 व्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकच्या पंतप्रधानांनी इमरान खान यांचे वक्तव्य खालच्या पातळीवरचे होते. इमरान खान यांनी खोटे आरोप केले. वैयक्तिक टीका केली. तसंच स्वत:च्या देशात अल्पसंख्यांकांचे होणारे हाल न पाहता भारतावर टीका करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. याला उत्तराच्या अधिकारातून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं भारताच्या प्रतिनिधींनी सांगितलं. 

हे वाचा - डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, 'लष्करी सामर्थ्याच्या बळावर शांतता टिकवून ठेवेन'

पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर असा खोटेपणा नवा नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीवेळीसुद्दा असाच प्रकार घडला होता. तेव्हाही पाकने काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बैठक अर्धवट सोडली होती.