जगात भारतीय हवाईदल तिसऱ्या स्थानी

हवाईदल प्रमुख विवेक राम चौधरी यांची माहिती; चीनला टाकले मागे
Indian-Airlines
Indian-AirlinesSakal

पुणे - ‘‘भारतीय हवाईदल हे जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर पोचले आहे. आधुनिक उपकरणे, शस्त्रास्त्र, विमानांमुळे हवाईदलाची ताकद वाढली आहे. तर भारत हे चीनच्या तुलनेत पुढे असल्याचे नुकतेच सादर करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड डायरेक्टोरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअर क्राफ्ट’ या अहवालातून स्पष्ट झाले आहे, ’’ असे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी सोमवारी येथे सांगितले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) दीक्षान्त संचलन सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना चौधरी म्‍हणाले, ‘‘हवाईदलात सध्या वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ विमाने आणि विविध तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. संसाधने, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, माहिती प्रणाली तसेच देखभाल सेवा मिळत आहेत. यामुळे विविध कारवायांसाठी हवाईदल सक्षम होत आहे. सहा देशांमध्ये तयार झालेल्या लढाऊ विमानांचा वापरही हवाईदल करत आहे. त्याचबरोबर ३९ फ्लिट हवाईदलात आहेत. अशा विविध गोष्टींमध्ये होत असलेली प्रगतीमुळे आज हवाईदलाचे सामर्थ्य वाढले असून आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर पोचलो आहोत.’’

सशस्त्र प्रणालीच्या देखभालीसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी येत्या काळात विविध शैक्षणिक संस्था, उद्योग एमएसएमईंसोबत करार करण्याची शक्यता आहे, असे ही त्यांनी सांगितले. तरुणांप्रमाणे आता तरुणीही या प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेणार असल्याने प्रबोधिनीत सर्व प्रकारच्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलांप्रमाणे आता मुलींना ही प्रशिक्षण मिळणार असून संरक्षण दलांना महिला व पुरुष अधिकारी उपलब्ध होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

रशिया-युक्रेनचा परिणाम नाही

रशियाकडून भारत तंत्रज्ञान, शस्त्रे, विमानांचे किंवा शस्त्रांचे सुटे भाग आयात करत आहे. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध असले तरी याचा सुटे भागांच्या पुरवठ्यावर फार मोठा परिणाम झाला नाही. उपकरणांचा साठा आणि स्वदेशीकरणाच्या धोरणांमुळे हे शक्य झाले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत स्वदेशीकरणावर तिन्ही दलांद्वारे भर देण्यात येत असल्याने भविष्यात मित्र देशांवरील अवलंबित्व कमी होईल.

आधुनिकीकरणावर भर

  • हवाईदलाला ८३ तेजस ही कमी वजनाची लढाऊ विमाने मिळणार

  • पुढील वर्षापासून हे विमान हवाईदलात दाखल होण्यास सुरवात

  • ‘एमआरएफए’ विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव पाठविला आहे

  • ऍडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एमका) आणि एलसीए मार्क-२ हे विमान खरेदी केले जाणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com