esakal | Corona Update : देशात दुसऱ्या लाटेचा धोका; 47 दिवसानंतर आलेख पुन्हा वरच्या दिशेने
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

भारतातदेखील कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. 

Corona Update : देशात दुसऱ्या लाटेचा धोका; 47 दिवसानंतर आलेख पुन्हा वरच्या दिशेने

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढतेच आहे. गेल्या काही दिवसांपासून संक्रमणाचे आकडे हे घटते होते. मात्र, आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा संक्रमणात वाढ होताना दिसून येते आहे. युरोपातील अनेक देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतातदेखील कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. 

हेही वाचा - आउट ऑफ टर्न प्रमोशन; दबंग कामगिरीनं कॉन्स्टेबल महिला बनली थेट इंस्पेक्टर

आता देशातील संक्रमणाची संख्या वाढून 90 लाखाच्या पार गेली आहे. देशभरात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या नव्या 46,232 केसेस समोर आल्या आहेत. यासोबतच देशातील संक्रमितांचा एकूण आकडा 90,50,597 वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 49,715 रुग्ण कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत. तर काल 564 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. आतापर्यंत देशात एकूण 1,32,726 लोकांचा या प्रादुर्भावात मृत्यू झाला आहे.  

देशभरात 24 तासांत सापडलेल्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. म्हणजेच सध्या देशातील रिकव्हरी रेट तेजीत आहे. सध्या रिकव्हरी रेट 93.67 टक्के आहे. तर ऍक्टीव्ह रुग्णांचा दर 4.85 टक्के आहे. देशातील मृत्यूदर 1.46 टक्के आहे तर पॉझिटीव्हीटी रेट 4.33 टक्के आहे. 

तब्बल 47 दिवसांना आलेख पुन्हा वरच्या दिशेने

दोन दिवसांपूर्वी गुरुवारी तब्बल 47 दिवसांनी देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या वाढली. गुरुवारी देशात 46 हजार 185 नवे रुग्ण सापडले तर 45 हजार 246 जण कोरोनामुक्त झाले. देशात 3 ऑक्टोबरपासून सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत होती त्यात वाढ झाली. 

हेही वाचा - दिल्लीतील प्रदुषणामुळे सोनिया गांधी गोव्यात;श्वसनाच्या त्रासामुळे डॉक्टरांचा सल्ला
देशात आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 84,78,124  आहे तर ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या 4,39,747 आहे. देशात गेल्या 24 तासांत एकूण 10,66,022 सँपल टेस्ट केले गेले आहेत. आतापर्यंत देशभरात एकूण 13 कोटी 6 लाख 57 हजार 808 सँपल तपासले गेले आहेत. 

loading image
go to top