ज्यो बायडेन यांच्या कॅबिनेटमध्ये दोन भारतीयांना संधी?

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 18 November 2020

ज्यो बायडेन यांच्या कॅबिनेटमध्ये भारतीय वशांच्या व्यक्तींना स्थान असणार आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे माजी सर्जन जनरल विवेक मूर्ती यांच्यासह दोन प्रमुख भारतीय-अमेरिकी नागरिकांना ज्यो बायडेन (joe Biden) आणि कमला हॅरिस (Kamla Harris) प्रशासनात कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील माध्यमांनी यासंबंधी बातम्या दिल्या आहेत. 

द वॉशिंग्टन पोस्ट आणि पॉलिटिकोने मंगळवारी म्हटले की, कोरोना महामारीविरोधात लढण्याप्रकरणी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन भारतीय-अमेरिकी सल्लागार विवेक मूर्ती यांना आरोग्य आणि मानव सेवा मंत्री बनवू शकतात. तसेच स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीचे प्रोफेसर अरुण मजूमदार यांना उर्जामंत्री बनवलं जाऊ शकतं. ज्यो बायडेन भारतीय-अमेरिकी वंशांच्या कमला हॅरिस यांना उपाध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांच्या कॅबिनेटमध्ये भारतीय वशांच्या व्यक्तींना स्थान असणार आहे.

43 वर्षीय विवेक मूर्ती सत्ता हस्तांत्तर कोविड-19 सल्लागार बोर्डाचे सह अध्यक्ष आहेत. ते कोरोना महामारी प्रकरणासंबंधी बायडेन यांचे जवळचे सहयोगी आहेत. तसेच अॅडवान्स रिसर्च प्रोडक्टस एजेंसी-एनर्जीचे पहिले निदर्शक मजूमदार उर्जा प्रकरणांसंबंधी बायडेन यांचे सल्लागार राहिले आहेत. 

रुग्ण स्वत:च करू शकणार कोरोना टेस्ट; 30 मिनिटात मिळेल रिपोर्ट

मजूमदार यांच्याशिवाय उर्जामंत्री पदासाठी माजी उर्जा मंत्री अर्नेस्ट मोनिज, स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीचे संधोधक डॅन रीचर आणि माजी उप-उर्जामंत्री एलिजाबेथ शेरवूड रैंडल शर्यतीत आहेत. आरोग्य आणि मानव सेवा मंत्रीपदासाठी मूर्ती यांच्याशिवाय उत्तरी कॅरोलाईनाचे आरोग्य आणि मानव सेवा मंत्री मैंडी कोहेन आणि न्यू मॅक्सिकोचे गव्हर्नर मिशेल लुजान ग्रीशम दावेदार आहेत. 

मूर्ती अमेरिकेचे डॉक्टर
    
बराक ओबामा यांच्याकडून नियुक्ती
१५ डिसेंबर २०१४ ते २१ एप्रिल २०१७ दरम्यान अमेरिकेचे महाशल्यविशारद
सर्जन जनरल या पदास अमेरिकेचे डॉक्टर असेही संबोधले जाते
गेली कित्येक महिने बायडेन यांना मूर्ती यांच्याकडून कोरोनाच्या जागतिक साथीबद्दल सल्ला
काही सूत्रांच्या माहितीनुसार आठवड्यातून एकदा बायडेन यांची मूर्ती यांच्याशी चर्चा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian american vivek murthy arun majumdar will be in joe biden cabinet