'Black live Matter'आंदोलनाचे नेतृत्व एका भारतीय-अमेरिकन महिलेच्या हाती  

Indian-American women are leading the 'Black Live Matter' movement
Indian-American women are leading the 'Black Live Matter' movement
Updated on

वॉशिंग्टन- अमेरिकेत सुरु असलेल्या 'ब्लॅक लाईव्हज मॅटर' आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये भारतीय-अमेरिकन नागरिक क्षमा सावंत अग्रणी आहेत. सिएटल सिटी  समुपदेशक महिला म्हणून कार्य करणाऱ्या क्षमा सावंत आंदोलनाच्या क्षेत्रापासून पोलिसांना बाहेर ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांना उत्साहित करत आहेत. विरोध प्रदर्शनाचे सिएटलमधील मुख्य क्षेत्र म्हणून कॅपिटल हिल स्वशासित क्षेत्र (सिएचएजेड) ओळखले जाऊ लागले आहे. याठिकाणी पोलिस अधिकाऱ्यांना येण्यापासून मज्जाव करण्यासाठी मोर्चे बांधणी होऊ लागली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

46 वर्षीय क्षमा सावंत  सॉफ्टवेअर इंजीनियर आहेत. ब्लॅक लाईव्ह मॅटर विरोध प्रदर्शनात सावंत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं दिसत आहे.  महाराष्ट्रातील मुंबईत जन्मलेल्या सावंत यांनी  सिएचएजेड क्षेत्रावर पकड मजबूत करण्यास निदर्शनकर्त्यांना सांगितलं आहे. तसेच या क्षेत्राला त्यांनी 'नो कॉप' म्हणजे पोलीस वर्जित क्षेत्र म्हणून घोषीत केलं आहे.
--------
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; प्रशासनाने घेतला 'हा' निर्णय
---------
दिल्लीनंतर जम्मू काश्मीरसह गुजरातही हादरलं; ६.८ तीव्रतेचा भूकंप
----------
दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल
----------
मंगळवारी अमेरिकेत 'पोलीस डिफंड' मोर्चा ( पोलिसांवर होणाऱ्या खर्चात मोठी कपात करुन तो पैसा शिक्षा, स्वास्थ आणि लोकांना घर मिळण्यासाठी खर्च करावा) काढण्यात आला होता. यावेळी सावंत यांनी या मोर्चात सक्रिय सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी निदर्शकांना सिटी हॉलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली होती. तसेच आंदोलनकर्त्यांनी यावेळी मेयर जैनी डर्कन यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती.

आफ्रिकन-अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांचा पोलिस कारवाईत मृत्यू झाला होता. एका गौरवर्णीय पोलिसाने कृष्णवर्णीय फ्लॉईड यांच्या गळ्यावर आपला गुडघा ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अमेरिकेत वर्णभेदविरोधी आंदोलनाने पुन्हा उसळी घेतली असून अनेक अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यात अनेक भारतीय वंशाचे नागरिकही सक्रियपणे भाग घेत असल्याचं दिसत आहे. सावंत यांनी या वर्णभेदाविरोधात मोर्चा काढला आहे.

कोण आहेत क्षमा सावंत?
1973 साली जन्मलेल्या क्षमा सावंत यांचं लहानपण मुंबईत गेलं आहे. मुंबई विश्वविद्यालयातून त्यांनी 1994 साली कॉम्प्युटर साईन्सचा अभ्यास पूर्ण केला. लग्नानंतर त्या अमेरिकेत आल्या आणि त्यांनी कॉम्प्युटर इंजीनियरिंग सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी उत्तर कॅरोलिया राज्य विद्यापीठातून अर्थशास्त्रातील पीचडीची पदवी प्राप्त केली आहे. 2006 साली त्यांनी स्वत:ला सामाजिक संस्थेशी जोडून घेत 2013 साली त्या समुपदेशक महिला झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com