भारतीय नशीबवान, कारण त्यांच्याकडे आहेत नरेंद्र मोदी : ट्रम्प

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मे 2019

-  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना विजयाबद्दल ट्विटवरून दिल्या शुभेच्छा. 

वॉशिंग्टन : लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशाबद्दल जगभरातील अनेक देशांच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींना विजयाबद्दल ट्विटवरून शुभेच्छा दिल्या. यामध्ये ट्रम्प म्हणाले, मोदी एक महान व्यक्ती, लोकनेते आहेत. सर्व भारतीय भाग्यवान आहेत, कारण त्यांच्याकडे मोदींसारखी व्यक्ती आहे. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यांच्या या विजयानंतर ट्रम्प म्हणाले, पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून संवाद साधला. अमेरिकेतील देशवासियांकडून त्यांचे अभिनंदन केले. ते माझे मित्र असून, भारत आणि अमेरिका या उभय देशांतील संबंध यापुढेही चांगले राहतील.'' 

ट्रम्प यांच्या ट्विटवर मोदींचे उत्तर

मीही  तुमच्यासोबत द्विपक्षीय संबंध वाढविण्यासाठी काम करण्यास उत्सुक आहे. जे जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी चांगले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian are fortune because they have Modi says Donald Trump