भारतीय जवान मारल्याचा पाकचा दावा फेटाळला

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवर 14, 15 व 16 नोव्हेंबरला केलेल्या गोळीबारात एकही भारतीय जवान हुतात्मा झालेला नाही. पाकच्या लष्कर प्रमुखांकडून करण्यात येत असलेल्या दावा चुकीचा आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी सीमेवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 11 भारतीय जवान मारल्याचा दावा भारताकडून फेटाळण्यात आला आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) 14 नोव्हेंबरला भारताने पाकिस्तानच्या सात जवानांना मारले त्याचदिवशी पाकिस्तानी सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात भारताचे अकरा जवान ठार झाल्याचे राहिल शरीफ यांनी म्हटले आहे. याच दिवशी भारतीय जवानांनी घुसखोरीचा कट उधळला होता. तर, राजौरी येथील तीन भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला होता.

शरीफ यांच्या दाव्यावर बोलताना नॉर्थन कमांडच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे, की पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवर 14, 15 व 16 नोव्हेंबरला केलेल्या गोळीबारात एकही भारतीय जवान हुतात्मा झालेला नाही. पाकच्या लष्कर प्रमुखांकडून करण्यात येत असलेल्या दावा चुकीचा आहे.

Web Title: Indian Army rejects Pakistan's claim of killing 11 soldiers along LoC