भारतीय व्यक्तीला पाकमध्ये अटक

पीटीआय
सोमवार, 22 मे 2017

ते भारतीय नागरिक असल्याचे समजताच त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, अहमद यांच्याकडे व्हिसा अथवा प्रवासी परवाना नसल्याने त्यांना अटक करण्यात आली. बेकायदा प्रवेश करून वास्तव्य करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे

इस्लामाबाद - प्रवासादरम्यान आवश्‍यक कागदपत्रे न बाळगल्याबद्दल एका भारतीय व्यक्तीस पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. शेख नबी अहमद असे या व्यक्तीचे नाव असून, ते मुंबईतील जोगेश्‍वरी (पूर्व) येथील रहिवासी आहेत. त्यांना 19 मे रोजी अटक होऊन न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद हे इस्लामाबादमधील सेक्‍टर एफ-8 मधील रस्त्यावरून जात असताना त्यांना तपास नाक्‍यावर पोलिसांनी अडविले. ते भारतीय नागरिक असल्याचे समजताच त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, अहमद यांच्याकडे व्हिसा अथवा प्रवासी परवाना नसल्याने त्यांना अटक करण्यात आली. बेकायदा प्रवेश करून वास्तव्य करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेबाबत कोणतीही माहिती नसल्याचे आणि पाकिस्तान सरकारनेही काही कळविले नसल्याचे येथील भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितले. भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना अटक आणि शिक्षा झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर अहमद यांना अटक झाली आहे.

Web Title: Indian arrested in Pakistan