अमेरिकेत आणखी एका भारतीयाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

अमेरिकेत गेल्या आठवड्यात भारतीय अभियंत्याच्या हत्येची घटना आणखी ताजी असतानाच भारतीय वंशाच्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

न्यूयॉर्क - अमेरिकेत गेल्या आठवड्यात भारतीय अभियंत्याच्या हत्येची घटना आणखी ताजी असतानाच भारतीय वंशाच्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

गुरुवारी रात्री हर्नीश पटेल या भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची साउथ कॅरोलिनामधील त्यांच्या घरासमोर हत्या करण्यात आली. पटेल रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांचे दुकान बंद करुन घरी जात असताना ही घटना घडली. स्थनिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पटेल यांच्या हत्येनंतर ते राहत असलेल्या लॅनकस्टर भागातील परिस्थिती तणावपुर्ण झाली आहे. हर्नीश पटेल तेथील भारतीय समुदायाचे महत्त्वाचे सदस्य होते. तपास अधिकाऱ्यांनी हत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसून तपास सुरु असल्याचे सांगितले. 

अमेरिकेत गेल्या आठवड्यात आमचा देश सोडुन जा असे म्हणत एका इसमाने श्रीनिवास कुचीभोटला या 32 वर्षीय भारतीय अभियंत्याची कन्सासमधील एका बारमध्ये हत्या केली होती. त्या वेळी बारमध्ये उपस्थित असलेल्या पैकी आलोक मदासनी या आणखी एका भारतीयावर बंदुक चालवण्यात आली. ज्यामध्ये ते जखमी झाले होते. या गुन्ह्यासाठी अॅडम प्युरींटन याला अटक करण्यात आली. भारतीयांवरील हल्ल्यानंतर त्याने दोन इराणी लोकांवरही बंदुक चालवल्याचे समजते.

Web Title: Indian businessman killed in USA