भारत, चिनी नौदलांकडून व्यापारी जहाजाची सुटका

पीटीआय
रविवार, 9 एप्रिल 2017

चिनी नौदलाकडून प्रत्यक्ष सागरी क्षेत्रात चाच्यांविरोधात कारवाई केले जात असताना भारतीय नौदलाने या कारवाईस "हवाई संरक्षण' पुरविले

नवी दिल्ली - एडनच्या आखातामध्ये समुद्री चाच्यांच्या तावडीत सापडलेल्या एका व्यापारी जहाजाची भारत व चीनच्या नौदलांनी सुटका केल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

ओएस 35 या जहाजावर काल (शनिवार) रात्री चाच्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळताच भारतीय नौदलाच्या दोन नौका तातडीने मदतकार्यासाठी रवाना झाल्या होत्या. चाच्यांच्या तावडीत सापडलेल्या या व्यापारी जहाजाच्या मदतीसाठी चिनी नौदलही घटनास्थळी दाखल झाले होते. या पार्श्‍वभूमीवर, चिनी नौदलाकडून प्रत्यक्ष सागरी क्षेत्रात चाच्यांविरोधात कारवाई केले जात असताना भारतीय नौदलाने या कारवाईस "हवाई संरक्षण' पुरविले.

दोन्ही देशांच्या नौदलांमधील पूरक सहकार्याने या जहाजाची सुटका करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: Indian, Chinese navies rescue hijacked merchant ship