अबुधाबीतील भारतीयाला 17 कोटींची लॉटरी

वृत्तसंस्था
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

या सोडतीचे तिकिटाचे मूल्य 500 दिरम होते. ते काढण्यासाठी नायरला त्याच्या तीन मित्रांनी आर्थिक मदत केली. त्यांच्याबरोबर तो बक्षिसाची किंमत वाटून घेणार आहे. नायर हा मूळ केरळमधील रहिवासी आहे

दुबई - अबुधाबी येथे राहणारा सुनील मप्पाटा कृष्णन कुट्टी नायर हा मूळचा भारतीय लॉटरीतून कोट्यधीश बनला आहे. त्याला लॉटरीतील सर्वाधिक किमतीचे दुसरे 10 लाख दिरमचे (अंदाजे 17 कोटी 68 लाख रुपये) बक्षीस लागले आहे, असे वृत्त "गल्फ न्यूज'ने दिले आहे.

या सोडतीचे तिकिटाचे मूल्य 500 दिरम होते. ते काढण्यासाठी नायरला त्याच्या तीन मित्रांनी आर्थिक मदत केली. त्यांच्याबरोबर तो बक्षिसाची किंमत वाटून घेणार आहे. नायर हा मूळ केरळमधील रहिवासी आहे. "द बिग तिकीट ड्रॉ'अंतर्गत या आधी 7 जानेवारीला काढलेल्या सोडतीत एक कोटी 20 लाखाचे बक्षीस मूळचा केरळमधील असलेल्या हरिकृष्णन व्ही. नायर याला मिळाले होते. हरिकृष्णन हा सध्या अजमान येथे राहतो.

Web Title: Indian hits a jackpot in Abu Dhabi draw

टॅग्स