भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर विदेशातही चालवा गाडी

जगातील 'या' १० देशांमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सने चालवू शकता गाडी
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर विदेशातही चालवा गाडी

कोणतंही वाहन चालवायचं असेल तर त्यासाठी वाहन परवाना असणं अत्यंत गरजेचं आहे. वाहन परवाना म्हणजेच लायसन्स जर नसेल तर तुम्ही कोणतीही गाडी चालवू शकत नाही. प्रत्येक देशाचा वाहन परवाना हा वेगवेगळा असतो. त्यामुळे कोणत्याही देशातील वाहन परवाना अन्य दुसऱ्या देशात वापरता येत नाही. मात्र, आता भारतीय वाहन परवान्याच्या आधारे तुम्ही जगातील १० देशांमध्ये बिंधास्तपणे गाडी चालवू शकता. (indian-international-driving-license-valid-countries)

विदेशातील निसर्ग, तेथील संस्कृती ज्याप्रमाणे नागरिकांना खुणावत असते. त्याचप्रमाणे तेथील स्वच्छ, सुंदर रस्त्यांवर एकदा तरी लाँग ड्राइव्हला जावं अशी अनेकांची इच्छा असते. विशेष म्हणजे अनेक भारतीयांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. भारतातील वाहन परवान्याच्या आधारे तुम्ही जगातील १० देशांमध्ये कार किंवा बाईक चालवू शकता. परंतु, या गाड्या चालवण्यापूर्वी तुमच्याकडे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट असणं गरजेचं आहे.

भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर विदेशातही चालवा गाडी
'या' चार गोष्टींमुळे महिलांच्या करिअरमध्ये निर्माण होते अडचण

अमेरिका -

अमेरिकेमध्ये तुम्ही भारतीय वाहन परवान्यावर १ वर्षापर्यंत गाडी चालवू शकता. यासाठी तुमचं लायसन्स व्हॅलिड आणि इंग्लिशमध्ये असणं गरजेचं आहे. जर लायन्सस इंग्रजीत नसेल तर ते अमेरिकत अवैध मानलं जाईल. तसंच येथे गाडी चालवण्यापूर्वी चालकाला I-94 फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये तुम्ही अमेरिकेत केव्हा येणार याची तारीख नमूद करण्यात आली असते. तसंच गरज पडल्यास हा फॉर्म दाखवल्यावर कोणीही तुम्हाला अमेरिकेत अडवणार नाही.

जर्मनी -

पब्लिक ट्रान्सपोर्ट ऐवजी स्वत: ड्राइव्ह करुन जर्मनी फिरण्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर येथे तुम्हाला तो आनंद मिळू शकतो. भारतीय वाहन परवान्याच्या आधारे तुम्ही जर्मनीमध्ये ६ महिने गाडी चालवू शकता. येथे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही. विशेष म्हणजे अमेरिकेप्रमाणे येथेदेखील तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजीमध्ये असणं आवश्यक आहे.

साऊथ आफ्रिका -

साऊथ आफ्रिकेमध्येही तुम्ही आरामात गाडी चालवू शकता. मात्र, अन्य देशांप्रमाणे येथे देखील तुमचं लायसन्स इंग्रजीमध्येच हवंय. सोबतच त्यावर तुमची स्वाक्षरी आणि फोटो असणं अत्यंत गरजेचं आहे.

न्युझीलँड -

न्युझीलँडमध्ये २१ वर्षांवरील व्यक्तीलाच गाडी चालवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जर तुम्ही २१ वर्षांवरील असाल तर येथील रस्त्यांवर नक्कीच गाडी चालवू शकता. येथेदेखील तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजीत असणं गरजेचं आहे. तसंच जर तुमचं लायसन्स इंग्रजीत नसेल तर न्युझीलँड प्रशासनाकडून ते इंग्रजीत करुन घ्यावं लागेल.

नॉर्वे -

युरोप खंडातील सर्वात सुंदर देशांमध्ये नॉर्वेचा कायमच उल्लेख केला जातो. येथील निसर्ग आणि पर्यावरण कायमच पर्यटकांना आकर्षित करत असतो. त्यामुळे जर येथील रस्त्यांवर मनमुरादपणे फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आता तो शक्य आहे. भारतीय वाहन परवान्याच्या आधारे तुम्ही येथे फिरु शकता. परंतु, हा परवाना केवळ ३ महिन्यांपूरताच मर्यादित आहे.

स्विर्त्झलँड

पृथ्वीवरील स्वर्ग अशी उपमा कायमच स्वित्झर्लडक ला दिली जाते. त्यामुळे पृथ्वीवरील या स्वर्गात तुम्ही गाडी चालवण्याचा आनंद घेऊ शकता. इंग्रजीत लायसन्स असल्यावर तुम्ही येथे १ वर्षापर्यंत गाडी चालवू शकता. तसंच येथे गाडीदेखील भाड्याने घेऊ शकता.

ऑस्ट्रेलिया -

न्यू साऊथ वेल्स, क्वीनलँड, साऊथ ऑस्ट्रेलिया येथे भारतीय वाहन परवाना चालतो. त्यामुळे येथे तुम्ही गाडी चालवू शकता. मात्र, उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये केवळ ३ महिनेच गाडी चालवण्याची परवानगी आहे.

कॅनडा -

मिनी पंजाब असंही कॅनडाला म्हटलं जातं. कॅनडात अनेक भारतीय व्यक्ती कायमस्वरुपी स्थायिक झाले आहेत. परंतु, येथे गाडी चालवायची असेल तर तुमच्याकडे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे. कारण, येथे भारतीय डीएल केवळ ६० दिवसांपर्यंतच वैध आहे.

फ्रान्स -

फ्रान्समध्ये तुम्ही १ वर्षापर्यंत भारतीय वाहन परवान्याच्या आधारे गाडी चालवू शकता. परंतु, येथे केवळ फ्रान्स भाषेत नमूद केलेलंच ड्रायव्हिंग लायसन्स लागतं. अन्य देशांप्रमाणे इंग्रजीत असलेलं लायसन्स येथे चालत नाही.

सिंगापूर -

सिंगापूरमध्येही विदेशी पर्यटकांना १ वर्षांपर्यंत गाडी चालवण्याची मुभा आहे. तसंच हाँगकाँ आणि मलेशियामध्येही इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सवर गाडी चालवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com