इटलीत इमारत कोसळून भारतीयासह दोन ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

रोम- इटलीच्या उत्तरेकडील शहरात पुरामुळे एक इमारत कोसळल्यामुळे दोन जण मरण पावले. मृतांमध्ये एका भारतीयाचा समावेश आहे. या पुरामुळे येथे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत.

सुरिंदर सिंग असे मरण पावलेल्या भारतीय व्यक्तीचे नाव आहे. सुरिंदर सिंग यांच्यावर चर्चच्या काही भाग पडला होता, असे वृत्त स्थानिक प्रसार माध्यमांनी दिले. त्याचप्रमाणे सेसानो शहरात घरावर झाड कोसळल्याने एका निवृत्त कर्नलचा मृत्यू झाला. या वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

या वादळामुळे 70 झाडे उन्मळून पडली तर दक्षिण भागातील अनेक शहरांमध्ये पाणीच पाणी झाले. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच आलेल्या शक्तिशाली भूकंपामुळेही इटलीचे मोठे नुकसान झाले होते.

Web Title: indian killed in italy

टॅग्स