Indian man killed in Canada : कॅनडामध्ये भारतीय व्यक्तीची गोळ्या घालून हत्या; टोरंटोमधील महिनाभरातील तिसरी घटना!

Indian man shot dead in Toronto : पार्थिव अंत्यसंस्कारासाठी शक्य तितक्या लवकर भारतात आणण्याची व्यवस्था करण्याचे कुटुबीयांचे सरकारला आवाहन .
Crime

Crime

sakal 

Updated on

Concerns Over Safety of Indian Community in Canada : कर्नाटकातील नेलामंगला येथील ३७ वर्षीय व्यक्तीची कॅनडामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. चंदन कुमार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी, टोरंटोच्या वुडबाईन शॉपिंग सेंटरच्या बाहेर हा गोळीबार करण्यात आला.

टोरंटो पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रेक्सडेल बुलेव्हार्ड आणि हायवे 27 जवळील पार्किंगमध्ये दुपारी साडेतीन वाजता गोळीबार झाल्याची बातमी समजली होती. पोलिसांना चंदन कुमारवर गोळीबार झाल्याचे आढळले. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर तिथे डॉक्टर मृत घोषित करण्यात आले.

ही घटना टोरंटोमधील २०२६ मधील तिसरी हत्या म्हणून नोंदवण्यात आली आहे. होमिसाईड अँड मिसिंग पर्सन्स युनिट आता या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेबाबत कोणतीही माहिती असल्यास पोलिसांनी जनतेला तपासकर्त्यांशी संपर्क साधण्याचे किंवा क्राईम स्टॉपर्सद्वारे अनामिकपणे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

Crime
BJP win ZP, Panchayat Samiti Elections : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपच अव्वल!, निकालांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

कर्नाटकातील चंदन कुमार यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या गाडीत बसलेले असताना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. कुटुंबियांनी त्यांच्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि भारत सरकारला त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी शक्य तितक्या लवकर भारतात आणण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com