BJP win ZP, Panchayat Samiti Elections : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपच अव्वल!, निकालांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Fadnavis comments on Zilla Parishad and Panchayat Samiti results 2026 : भाजपने २०१७चा रेकॉर्ड मोडला असल्याचेही फडणवीसांनी आवर्जून सांगितले; याचबरोबर महायुतीचीच सत्ता येईल, हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे, असंही म्हणाले आहेत.
Chief Minister Devendra Fadnavis addressing the media after BJP’s strong performance in Zilla Parishad and Panchayat Samiti elections.

Chief Minister Devendra Fadnavis addressing the media after BJP’s strong performance in Zilla Parishad and Panchayat Samiti elections.

esakal

Updated on

BJP Emerges as Top Party in Zilla Parishad and Panchayat Samiti Elections : राज्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यात भाजपच सर्वाधिक जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. शिवाय, भाजपने २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीचाही रेकॉर्ड मोडल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण निकालावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मीडियाला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

जिल्हापरिषद निवडणूक निकालावर फडणवीस काय म्हणाले? -

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महायुतीचीच सत्ता येईल, हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे. आपण जर बघितलं तर जवळपास सात ठिकाणी भाजप क्रमांक एकवर आहे. छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा. शिवसेना रत्नागिरी आणि रायगड या दोन ठिकाणी क्रमांक एकवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात क्रमांक एकवर आहे. याशिवाय जिथे तिन्ही पक्ष एकत्रित लढलो, अशा सोलापूर आणि लातूर मध्येही महायुतीच क्रमांक एकवर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, अतिशय चांगला असा कल समोर आलेला आहे.

भाजपने आपला २०१७चा रेकॉर्ड तोडलेला आहे. २०१७साली ज्या जिल्हापरिषदांमध्ये भाजपला १४१ जागा होत्या, आता अजून निकाल पूर्ण व्हायचे आहेत. परंतु घोषित झालेल्या निकालांमध्येहीन २३६ जागा भाजपला मिळालेल्या आहेत आणि भाजप क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर आला आहे.

Chief Minister Devendra Fadnavis addressing the media after BJP’s strong performance in Zilla Parishad and Panchayat Samiti elections.
Giant Wheel Collapse : जत्रेतील 'झुला' कोसळल्याने भीषण दुर्घटना!, अनेकजण गंभीर जखमी, एकाचा मृत्यू

पंचायत समिती निकालावर काय म्हणाले? –

आपण जर पंचायत समितीचा विचार केला, तर आतापर्यंत घोषित झालेल्या जागांमध्ये २०१७मध्ये भाजपला एकूण सगळ्या जागा मिळून २८४ जागा होत्या, पण आतापर्यंतचा जो कल आहे त्यात ४०६ जागा भाजपला मिळालेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की भाजपने एक मोठी उडी मारलेली आहे. अशाचप्रकारे आमच्या मित्रपक्षांनाही चांगल्या जागा मिळालेल्या आहेत. साधारणपणे आपण जर १२५ पंचायत समितीचा जर कल बघितला, तर या १२५ पैकी ५० पंचायतसमिती भाजपकडे असतील. २६ शिवसेनेकडे असतील आणि २३ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील.

Chief Minister Devendra Fadnavis addressing the media after BJP’s strong performance in Zilla Parishad and Panchayat Samiti elections.
ICC T20 World Cup Hat-Trick : आयसीसी टी-२० विश्वचषकात इतिहास घडवणारे , आठ 'हॅट्रिक'वीर गोलंदाज!

बाकी मग आपण जर बघितलं तर सात ते आठ काँग्रेसकडे, सात ते आठ शरद पवार यांच्या पक्षाकडे आणि ठाकरे गटाकडे पाच अशा पद्धतीची आताची परिस्थिती आहे. त्यामुळे इथेही महायुतीला १२५ पैकी १०० पेक्षाही जास्त पंचायत समिती जिंकता आलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com