मुलांचे पॉर्न फोटो स्टोअर केल्याने भारतीयाला शिक्षा

वृत्तसंस्था
रविवार, 5 ऑगस्ट 2018

अभिजितने बेकायदेशीरपणे त्याच्या कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये सुमारे एक हजारांहून अधिक बालकांचे पॉर्न फोटो साठविले. तसेच सुमारे 380 व्हिडिओही त्याने त्याच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केल्याचे समोर आले आहे.

न्यूयॉर्क : सुमारे एक हजाराहून अधिक बालकांचे पॉर्न फोटो साठविल्याने अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय व्यक्तीला येथे अटक करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयाने त्याला 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 

अभिजित दास असे संबंधित 28 वर्षीय तरुणाचे नाव असून, तो मूळचा भारतीय रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. सध्या तो पिट्सबर्ग येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. अभिजित दासला येथील फेडरल न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याबाबतचा निकाल अमेरिकेतील अॅटर्नी स्कॉट ब्रॅडी यांनी दिला. अभिजितने बेकायदेशीरपणे त्याच्या कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये सुमारे एक हजारांहून अधिक बालकांचे पॉर्न फोटो साठविले. तसेच सुमारे 380 व्हिडिओही त्याने त्याच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केल्याचे समोर आले आहे.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याच्याविरोधात येथील एका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयात त्याला हजर केले असता चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Man In US Stored 1000 Child Porn Photos Gets 4 Years In Jail