Fast Five Lottery : भारतीय व्यक्तीला दुबईमध्ये लागली बंपर लॉटरी! पुढील 25 वर्षं दरमहा मिळणार 5.5 लाख रुपये

Dubai Lottery : अगदी योग्य वेळी ही लॉटरी लागली असल्याचं मत आदिल यांनी व्यक्त केलं.
Dubai Lottery
Dubai LotteryeSakal

दुबईमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला बंपर लॉटरी लागली आहे. या लॉटरीमुळे त्याला पुढील 25 वर्षांपर्यंत दरमहा 5.5 लाख रुपये मिळणार आहेत. उत्तर प्रदेशचा रहिवासी असणाऱ्या मोहम्मद आदिल खान याला 'फास्ट फाईव्ह ड्रॉ' ही मेगा लॉटरी लागली आहे.

आदिल हे दुबईमध्ये एका रिअल इस्टेट कंपनीमध्ये काम करतात. ते इंटिरिअर डिझाईन सल्लागार आहेत. सध्या संपूर्ण कुटुंबात मी एकटाच कमावता आहे. त्यामुळे अगदी योग्य वेळी ही लॉटरी लागली असल्याचं मत आदिल यांनी व्यक्त केलं. पीटीआय वृत्तसंस्थेने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

Dubai Lottery
Lottery Ticket: बाईपण भारी देवा! 11 जणींनी 25 रुपये गोळा करुन काढली लॉटरी, लागला 10 कोटींचा जॅकपॉट

कोरोनामध्ये भावाचं निधन

आदिल यांनी सांगितलं, की "सध्या संपूर्ण कुटुंबामध्ये मी एकटाच कमावता आहे. माझ्या भावाचं कोरोनामध्ये निधन झालं होतं. तेव्हापासून त्याच्या कुटुंबाचा सांभाळही मीच करत आहे. यामुळे बरीच कसरत करावी लागत होती, मात्र अगदी गरजेच्या वेळी मला हे पैसे मिळाले आहेत.

"मला खरंतर यावर विश्वासच बसला नव्हता. मलाच नव्हे, तर माझ्या कुटुंबीयांनाही हे खरं वाटलं नाही. त्यांनी मला परत एकदा बातमी तपासून घेण्यास सांगितलं. त्यानंतर सर्वांची खात्री पटली, की मी खरंच ही लॉटरी जिंकलोय." या लॉटरीमुळे आता आदिलला दरमहा 25,000 धिरम (सुमारे 5.5 लाख रुपये) मिळणार आहेत. (Dubai Fast 5 Lottery)

Dubai Lottery
Lottery: ३० वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळणार १० लाख, पण लॉटरी लागलेला माणूसच बेपत्ता; काय आहे प्रकरण?

फास्ट 5 लॉटरी

या लॉटरीला 'फास्ट 5' म्हटलं जातं, कारण कोट्यधीश होण्याचा हा सर्वात वेगवान मार्ग आहे. ही लॉटरी लाँच केल्यानंतर दोन महिन्यांच्या आतच याचा विजेता घोषित करण्यात आला आहे. विजेत्याला पुढील 25 वर्षांपर्यंत नियमित रक्कम मिळावी यासाठी ही लॉटरी डिझाईन करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com