
NASA च्या चंद्रवरील स्वारीचे नेतृत्व भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे, कोण आहे अमित क्षत्रिय?
नासाने नवीन कार्यालय सुरू केलं असून त्याला मून टू मार्स प्रोग्राम ऑफिस असं नाव देण्यात आलं आहे. हे कार्यालय चंद्र आणि मंगळावरील मानवी मिशन्ससाठीचे नियोजन, डिझाइन आणि पूर्ण करण्यासाठी मोहिमा तयार करेल. अमेरिकन स्पेस एजन्सी(NASA) ने एका भारतीय वंशाचे अमित क्षत्रिय यांची प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
मून टू मार्स प्रोग्राम ऑफिसचे कार्यालय एक्सप्लोरेशन सिस्टम्स डेव्हलपमेंट मिशन डायरेक्टोरेट मध्ये असेल. अमित नासाचे असोशिएटेड अॅडमिनिस्ट्रेटर जिम फ्री यांना रिपोर्ट करतील.नासाचे प्रमुख आणि प्रशासक बिल नेल्सन यांनी सांगितले की, मून टू मार्स प्रोग्राम ऑफिस चंद्रावरच्या मोहिमेवर आणि मानवाला मंगळावर उतरवण्याच्या मिशनवर काम करतील.
हा काळ अवकाशातील संशोधनाचा सुवर्णकाळ असल्याचे बिल म्हणाले. मला आशा आहे की नवीन कार्यालय नासाला चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी तयार करेल. जेणेकरून माणुसकी विकसीत होईल.
अमित क्षत्रिय नासाच्या सर्वात मोठ्या आर्टेमिस मिशनचे आणि मानवांना मंगळावर नेण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत. या आधी अमित कॉमन एक्सप्लोरेशन सिस्टम्स डेव्हलपमेंट डिव्हीजमध्ये डिप्टी असोशिएट अॅडमिनिस्ट्रेटर होते. या पदावर असतानाच त्यांनी नासाचे सर्वात मोठे मिशन अर्टेमिस च्या स्पेस लाँच सिस्टिम म्हणजेच सर्वात मोठे रॉकेट ओरियन स्पेसक्राफ्ट आणि एक्सप्लोरेशन ग्राउंड सिस्टम्स प्रोग्राम्स बनवले होते.
हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
अमित क्षत्रिय हे २००३ मध्ये सॉफ्टवेअर इंजीनियर म्हणून नासामध्ये रुजू झाले होते. त्यांनी रोबोटिक्स इंजीनियर आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेटर म्हणून देखील काम केले आहे. त्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर रोबोटीक असेंब्ली प्रमुख म्हणून देखील काम पाहिले. २०१४ ते २०१७ पर्यंत अमित क्षेत्रिय हे स्पेस स्टेशन फ्लाइट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. यादरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय एस्ट्रोनॉट्स चीम ऑपरेशन्स आणि फ्लाइट संचलन केले होते.
अमित क्षत्रिय हे २०१७ ते २०२१ दरम्यानच्या काळात आयएसएस व्हेकल ऑफिस मध्ये डिप्टी आणि नंतर अॅक्टिंग मॅनेजर बनले. २०२१ मध्ये त्यांनी नासाच्या मुख्यालयात एक्सप्लोरेशन सिस्टम्स डेव्हलपमेंट मिशन डायरेक्टोरेट मध्ये त्यांना असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेट बनवण्यात आले.
अमित त्या स्पेसक्राफ्ट म्हणजेच ओरियन विकसीत करणाऱ्या टीमचे ते प्रमुख सदस्य राहिले आहेत, ज्या टीमने काही महिन्यांपूर्वी अर्टेमिस-१ मिशनच्या रॉकेटने लॉन्च केलेले ओरियन स्पेसक्राफ्ट चंद्रावरून यशस्वीरित्या परत आणले आहे. अमित पासाडेना येथिल कॅलिफोर्निया इंस्टिट्यून ऑफ टेक्नोलॉजीमध्ये बिएससी केलं आहे.
त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सस येथून गणितात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. अमित क्षत्रिय हे टेक्सासच्या केटी मध्ये पत्नी आणि तीन मुलांसह राहतात. अमित यांचे आई-वडिल भारतातून अमेरिकेत गेले होते. अमित यांचा जन्म विस्कॉन्सिन च्या ब्रुकफील्ड मध्ये झाला. त्यांना नासाता आउटस्टँडींह लीडरशीप मेडल देखील मिळाले आहे.
अमित क्षत्रिय यांना सिल्वर स्नूपी अवॉर्ड देखील मिळाला आहे. हा अवॉर्ड एस्ट्रोनॉट्सना स्पेस स्टेशनपर्यंत पोहचवून त्यांना वापस घेऊन आल्याबद्दल देण्यात येते. यासोबतच सिल्वर स्नूपी अवॉर्ड कमर्शियल ऑर्बिटल ट्रांसपोर्टेशन सर्विसेस ड्रॅगनच्या रोबॉटीक्स इंजीनिरिंग साठी मिळाला आहे.