London News : परिचारिकेने घेतला सात बाळांचा जीव; भारतीय वंशाच्‍या डॉक्टरकडून खटल्यात मदत

चेस्टर येथील काउंटीज ऑफ चेस्टर’ या रुग्णालयात परिचारिकेचे काम करणारी लूसी लेटबी हिने हे अमानवी कृत्य केले आहे
indian origin doctor helps catch nurse guilty of killing 7 babies in uk hospital
indian origin doctor helps catch nurse guilty of killing 7 babies in uk hospital sakal

लंडन : उत्तर इंग्लंडमधील रुग्णालयातील परिचारिकेने वर्षभरात सात नवजात शिशूंची हत्या केली असून न्यायालयाने शुक्रवारी (ता.१८) तिला दोषी ठरविले आहे. चेस्टर येथील काउंटीज ऑफ चेस्टर’ या रुग्णालयात परिचारिकेचे काम करणारी लूसी लेटबी हिने हे अमानवी कृत्य केले आहे. तिच्यावर दोष सिद्ध होण्यासाठी भारतीय वंशाच्या बालरोगतज्ज्ञाने न्यायालयाला मदत केली.

लूसी (वय ३३) रुग्णालयात जन्मलेल्या सात नवजात शिशूंची हत्या केली असून अन्य सहा बाळांना मारण्याचा प्रयत्न केला होता. या निर्घृण कृत्याबद्दल मॅचेंस्टर क्राउन न्यायालयाच्या न्यायाधीशांनी तिला काल दोषी ठरविले. तिला सोमवारी (ता.२१) शिक्षा जाहीर होणार आहे. चेस्टर रुग्णालयातील भारतीय वंशाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. रवी जयराम यांना लूसीबद्दल संशय आल्याने त्यांनी रुग्णालयाला सावध केले होते.

ती दोषी ठरल्यानंतर बोलताना ते म्हणाले, ‘‘या परिचारिकेबद्दल मी व्यक्त केलेल्या संशयाकडे आधीच लक्ष दिले असते तर काही बाळांचे जीव वाचले असते. शेवटी एप्रिल २०१७ मध्ये ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ ट्रस्टने पोलिसांची भेट घेण्याची परवानगी दिली. आम्ही माहिती देत असताना पोलिसांनी तपास सुरू केला व लूसी लेटबी हिला अटक झाली.’’

‘मी दुष्ट आहे’

ब्रिटनमधील क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस (सीपीएस) म्हटले की २०१५ आणि २०१६ या काळात रुग्णालयातील नवजात शिशूंच्या विभागात १३ बाळांवर हल्ला करण्यासाठी लेटबीने विविध पद्धतींचा वापर केला. यामध्ये बाळांच्या रक्तात इंजेक्शनद्वारे हवा आणि इन्सुलिन सोडणे, अन्ननलिका मार्गात हवा सोडणे, दूध किंवा द्रवपदार्थांचा मारा करणे, असे अघोरी उपाय करून तिने बाळांचा जीव घेतल्याचे पुरावे ‘सीपीएस’ने न्यायालयात दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com