अमेरिकेत भारतीय वंशाच्या उद्योगपतीची हत्या; मैत्रिणीच्या गाडीतच मृतदेह

वृत्तसंस्था
Saturday, 5 October 2019

कॅलिफोर्नियातील त्यांच्या घरातून त्यांना पळवून नेण्यात आले होते. घरात घुसलेल्या काहींनी अत्रे यांना त्यांच्या मैत्रिणीच्या मोटारीतून पळवून नेल्याचे वृत्त 'लॉसएजेंलिस टाइम्स'ने दिले आहे.

वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या एका उद्योगपतीचा मृतदेह त्याच्या मैत्रिणीच्या मोटारीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. तुषार अत्रे (वय 50) असे या उद्योगपतीचे नाव असून, 'अत्रेनेट एन्कॉर्पोरेटेड' ही वेब डिझाईन कंपनी त्यांच्या मालकीची आहे.

कॅलिफोर्नियातील त्यांच्या घरातून त्यांना पळवून नेण्यात आले होते. घरात घुसलेल्या काहींनी अत्रे यांना त्यांच्या मैत्रिणीच्या मोटारीतून पळवून नेल्याचे वृत्त 'लॉसएजेंलिस टाइम्स'ने दिले आहे.

पोलिसांच्या तपासात अत्रे यांचा मृतदेह मोटारीत आढळला. या प्रकरणात अनेक संशयित असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. 50 वर्षीय तुषार यांची सिलीकॉन व्हॅलीमध्ये कंपनी होती. तुषार हे यशस्वी उद्योजक होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian-Origin US Tech Millionaire Tushar Atre Kidnapped Days Ago Found Dead In Car