Canada Cabinet Esakal
ग्लोबल
कॅनडाच्या मंत्रिमंडळात २ भारतीय वंशाच्या महिला, एक होती पंतप्रधान पदाची दावेदार
Canada Cabinet : कॅनडाच्या पंतप्रधान पदी मार्क कार्नी यांनी शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ जाहीर करण्यात आले. यात भारतीय वंशांच्या दोन महिलांची वर्णी लागलीय.
कॅनडात मार्क कार्नी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर आता त्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा झालीय. भारतीय वंशांच्या दोन महिलांची वर्णी कार्नी यांच्या मंत्रीमंडळात लागलीय. भारतीय कॅनेडियन असलेल्या अनीता आनंद आणि दिल्लीत जन्मलेल्या कमल खेरा या दोघी मंत्री झाल्या आहेत. मार्क कार्नी यांनी पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची जागा घेतली. ट्रुडोंनी जानेवारीत राजीनाम्याची घोषणा केली होती.