
नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे फक्त ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी गेले होते. मात्र गेल्या ८ महिन्यांपासून अंतराळात अडकलेत. त्यांना पृथ्वीवर सुखरुप परत आणण्याासठी नासा आणि स्पेसएक्सने क्रू १० मिशन लाँच केलं आणि क्रू १० आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल झालं. अंतराळात सुनिता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांच्याजवळ पोहोचताच सर्वांनीच आनंद व्यक्त केला. एकमेकांना मिठी मारून अंतराळवीरांनी आनंद साजरा केला. याचा व्हिडीओ नासाने शेअर केलाय.