
चायवाला रेस्टॉरंटच्या भारतीय मालकाने अंतराळात समोसा पाठवण्यासाठी तीनवेळा प्रयत्न केला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळालं आहे.
लंडन - अंतराळ संशोधन संस्था अंतराळात एखादे यान पाठवताना त्यात प्रयोग म्हणून कधी प्राणी, वस्तू पाठवतात. त्या वातावरणात यावर काही परिणाम होतो का हे पाहण्यासाठी असं केलं जातं. मात्र सध्या अंतराळात पाठवण्यात आलेला समोसा ट्रेंड होत आहे. याला कारणही असंच आहे. ब्रिटनमधील एका भारतीय रेस्टॉरंटने अंतराळात समोसा पाठवला होता. पण अंतराळात पोहोचण्याआधीच तो फ्रान्समध्ये तो पडला.
बाथमधील लोकप्रिय असं चायवाला रेस्टॉरंट आहे. चायवाला रेस्टॉरंटच्या भारतीय मालकाने अंतराळात समोसा पाठवण्यासाठी तीनवेळा प्रयत्न केला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळालं आहे.
चायवालाचे मालक नीरज यांचं म्हणणं आहे की, जगात आनंद पसरवण्याच्या उद्देशाने त्यांच्या मनात समोसा अंतराळात पाठवण्याचा विचार आला होता. एकदा मजेतच सर्वांना म्हटलं होतं की अंतराळात समोसे पाठवेन. निराशेच्या काळातही सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं एक कारण बनला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हे वाचा - सेल्फीने घेतला जीव! दुसऱ्याचा धक्का लागून नदीत कोसळली तरुणी; VIDEO VIRAL
रेस्टॉरंटचे मालक नीरज यांनी समोसे पाठवण्यासाठी हेलियमच्या फुग्यांचा वापर केला होता. तीनवेळा त्यांनी असा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा त्यांच्या हातातून हेलियमचा फुगा निसटला होता. दुसऱ्यावेळी फुग्यात पुरेसं हेलियम नव्हतं. तर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात फुग्यासह समोसा अंतराळात सोडताना दिसत आहेत.