भारताच्या तिन्ही दलांचे रशियात शानदार संचलन 

भारताच्या तिन्ही दलांचे रशियात शानदार संचलन 

मॉस्को - रशियातील "विजय दिन संचलना'त भारताच्या तिन्ही दलांनी शानदार सादरीकरण केले. या सोहळ्यासाठी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आले आहेत. "भारतीय सशस्त्र दलांसाठी हा क्षण अभिमानाचा आणि विशेष आहे,' असे सांगतानाच त्यांनी या सोहळ्याचे काही फोटो ट्टिटद्वारे प्रसिद्ध केले. चीन-भारतादरम्यानच्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर लष्करासह संरक्षणमंत्र्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मॉस्कोतील रेड स्क्वेअरमध्ये हे संचलन झाले. या वेळी शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले. रशियाने जर्मनीच्या नाझी सैन्यावर विजय मिळविल्याच्या घटनेस 75 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त हा भव्य लष्करी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये रशियाने आपल्या संरक्षणसामर्थ्याचे शक्तिप्रदर्शन केले. या वेळी अन्य काही देशांचे मोठे नेते आणि प्रतिनिधीही उपस्थित होते. 

ही परेड 9 मे रोजी होणार होती, मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली होती. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध असताना गेल्या चार महिन्यांत परदेश दौरा करणारे राजनाथ सिंग हे पहिलेच वरिष्ठ केंद्रीय मंत्री आहेत. 

उपपंतप्रधानांची भेट 
रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरीसोव यांनी मंगळवारी राजनाथ सिंग यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये परस्परसंबंध, प्रादेशिक प्रश्‍न आणि संरक्षणसामग्रीची मदत याविषयी चर्चा झाली. दोन्ही देशांतील संबंध आणखी दृढ होतील, असा विश्‍वास बोरीसोव यांनी व्यक्त केल्याचे, राजनाथ सिंग यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com