esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

lottery

UAE त भारतीयांचे नशिब फळफळले! एका रात्रीत झाला कोट्यधीश, पण...

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली : युएईमध्ये (UAE) एका भारतीय नागरिकाचे नशिब फळफळले.. चक्क २० कोटी रुपयांची लॉटरीही जिंकली. रविवारी अबुधाबीमध्ये या लकी ड्रॉचं (Lucky draw) आयोजन करण्यात आलं होतं. त्यात या भारतीयाने लॉटरी जिंकली...नावही घोषित करण्यात आले. पण त्यानंतर असे काही घडले की, हे कोट्यावधी पैशांचं आता काय होणार? असं क्षणात वाटू लागले. काय घडले नेमके?

एका रात्रीत झाले कोट्यधीश...पण...

विजेत्या ठरलेल्या लकी ड्रॉचा नंबर होता 278109. युएईमध्ये (UAE) एका भारतीय नागरिकानं कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकून देखील त्याच्या नशिबी ते पैसे नाही. लॉटरी जिंकणारे हे केरळचे मूळ रहिवासी आहेत त्यांचे नाव नहील आहे. नहील यांचे दोन्ही मोबाईल नंबर सध्या बंद असून त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांच्या पहिल्या नंबरवर कॉल केल्यानंतर नंबर संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याची सूचना ऐकू येते. एकदा इंग्रजीतून आणि एकदा मल्याळी भाषेतून ही सूचना ऐकवली जाते. तर दुसरा नंबर आऊट ऑफ रिच आहे. हे दोन्ही नंबर लागत नसल्याने नहील यांना संपर्क तरी कसा साधायचा, असा प्रश्न लॉटरी कंपनीला पडला आहे.

हेही वाचा: चीनची ५६ फायटर विमानं घुसली तैवानमध्ये

आणखी एका भारतीयाचे नशिब उजळले....कोट्यधीश होणारे 15 वे नागरिक

ही लॉटरी दुसऱ्या क्रमांकाने जिंकणारी व्यक्तीदेखील भारतीयच आहे. सौदी अरेबियात राहणारे भारतीय प्रवासी अँजेलो फर्नांडिस यांनी लॉटरी जिंकली आहे. यापूर्वीदेखील दुबईतील राहणाऱ्या एका भारतीय प्रवाशाने ‘महजूज मिलेनियर ड्रॉ’मध्ये सहभाग घेत घसघशीत रक्कम जिंकली होती. एका रात्रीत ते कोट्यधीश झाले होते. लॉटरीची मुदत संपण्यापूर्वी केवळ काही तास अगोदर त्यांनी लॉटरी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मीर हे लॉटरी जिंकून कोट्यधीश होणारे 15 वे नागरिक ठरले आहेत.

हेही वाचा: लखीमपूरमध्ये गोळीबार नाही, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासे

विजेताच गायब

गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा संपर्क होत नसून हा विजेता नेमका आहे कुठे? याचा अनेकजण शोध घेत आहेत. चिंतेची बाब म्हणजे या व्यक्तीचा फोनच लागत नसून त्या व्यक्तीकडूनही कुणाला फोन येत नसल्याचं सांगितलं जात आहे.

loading image
go to top